Sangli Crime: वटपौर्णिमेच्या दिवशीच नवऱ्याचा घेतला जीव, पत्नीने लग्नाच्या 15 दिवसातच थेट कुऱ्हाडीनेच...

मुंबई तक

12 Jun 2025 (अपडेटेड: 12 Jun 2025, 01:15 PM)

कुपवाडमधील प्रकाश नगर येथील एकता कॉलनीत ही घटना घडली. 45 वर्षीय अनिल तानाजी लोखंडे यांची 27 वर्षीय राधिका बालकृष्ण इंगळे यांच्याशी विवाह झाला होता

Mumbai Tak
Google CTA

बातम्या हायलाइट

point

सांगलीत पत्नीने पतीला संपवलं

point

लग्नाच्या 15 दिवसानंतर घडली घटना

point

मृत व्यक्तिने केलं होतं दुसरं लग्न

Sangli News : सांगलीतील कुपवाड शहरात वट पूर्णिमेच्या रात्री एक हृदयद्रावक घटनेनं संपूर्ण परिसर हादरला आहे. एकीकडे विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वटवृक्षाची पूजा आणि उपवास करत होत्या. दुसरीकडे त्याचवेळी एका नवविवाहितेने आपल्या पतीची कुऱ्हाडीने निर्घृण हत्या केली. इंदोरमधील राजा रघुवंशी हत्याकांड देशभरात चर्चेत असतानाच सांगलीत ही घटना घडली आहे.  

हे वाचलं का?

वट पौर्णिमेच्या रात्री केला कुऱ्हाडीने हल्ला

कुपवाडमधील प्रकाश नगर येथील एकता कॉलनीत ही घटना घडली. 45 वर्षीय अनिल तानाजी लोखंडे यांचा 27 वर्षीय राधिका बालकृष्ण इंगळे यांच्याशी विवाह झाला होता. 11 ते 12 जून 2025 च्या रात्री राधिकाने कुऱ्हाडीने अनिल यांच्यावर हल्ला करून त्यांची हत्या केली. अनिल यांच्या डोक्यावर आणि हातावर वार करण्यात आले. या हल्ल्यात अनिल यांचा जागीच मृत्यू झाला.

हे ही वाचा >> धर्म बदलण्यासाठी सासरच्यांकडून छळ, सांगलीत गर्भवती महिलेनं स्वत:ला संपवलं, कुटुंबीय म्हणाले...

घटनेची माहिती मिळताच कुपवाड एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. पोलिसांनी राधिकाला ताब्यात घेतलं असून, हत्येमागील खरं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. सध्या पोलीस आरोपी राधिकाची कसून चौकशी करत आहेत.

अनिल यांचं होतं दुसरं लग्न

अनिल लोखंडे यांचं हे दुसरं लग्न होतं. त्यांच्या पहिल्या पत्नीचा कर्करोगाने मृत्यू झाला होता. पहिल्या लग्नापासून त्यांना दोन मुली असून, त्यांची लग्ने झाली आहेत. पोटाच्या आजाराने त्रस्त असलेले अनिल एकटेच राहत होते. नातेवाईकांच्या सल्ल्यानं त्यांनी 17 मे 2025 रोजी सातारा जिल्ह्यातील वादी गावच्या राधिका इंगळे यांच्याशी दुसरं लग्न केलं. मात्र, अवघ्या एका महिन्यात ही धक्कादायक घटना घडली.

हे ही वाचा >> "प्राचार्याकडून जातीवाचक शिवीगाळ", विद्यार्थ्यानं वसतिगृहाच्या खोलीतच बेल्टने... नवी मुंबईत काय घडलं?

वटपौर्णिमेला विवाहित महिला पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सात जन्मांच्या सहवासासाठी प्रार्थना करतात. पण, याच रात्री राधिकाने आपल्या पतीचा जीव घेतला. कुपवाड एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यानं सांगितलं की, राधिकाला घटनास्थळावरून अटक करण्यात आली आहे. तिच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, हत्येमागील कारणांचा सखोल तपास सुरू आहे.