कराड शहर स्फोटानं हादरलं! 9 जखमी, 7 घरांना गेले तडे, नेमकं घडलं काय?

इम्तियाज मुजावर

• 10:00 AM • 25 Oct 2023

करामधील मुजावर कॉलनीमध्ये स्फोट होऊन 9 जण जखमी झाले असून 7 घरांची पडझड झाली आहे. हा स्फोट इतका भीषण होता की, एका घराच्या भिंतीचा काही भाग 25 फूट उंच उडून तो दुसऱ्या घरावर पडला. त्यामुळे नागरिकांबरोबरच परिसरातील घरांचेही प्रचंड नुकसान झाले आहे.

satara karad cylinder blast mujawar colony in karad 9 people injured houses were also destroyed

satara karad cylinder blast mujawar colony in karad 9 people injured houses were also destroyed

follow google news

Karad News: कराड शहरातील मुजावर कॉलनीमध्ये (Mujawar Colony) बुधवारी सकाळी साडेसहा ते सात वाजण्याच्या सुमारास भीषण स्फोट (Terrible explosion) झाला. या स्फोटामुळे घराची भिंतीचा काही भाग सुमारे 25 फूट वरती उडून समोरील घराच्या पत्र्यावर पडला होता. तर या स्फोटात शरीफ मुल्ला यांच्या कुटूंबातील 9 जण जखमी झाले आहेत. स्फोट एवढा जबरदस्त होता की 7 घराच्या भिंतींचीही पडझड झाली असून घरं धोकादायक बनली आहेत. या स्फोटामुळे 6 दुचाकी वाहनांचेही नुकसान झाले आहे. या स्फोटाचे कारण मात्र अद्याप समजले नाही.(satara karad cylinder blast mujawar colony in karad 9 people injured houses were also destroyed)

हे वाचलं का?

कुटुंबीयांना संधीच नाही

मुजावर कॉलनीतील शांतीनगर येथे शरीफ मुल्ला कुटूंबासह राहतात. बुधवारी सकाळी त्यांच्या घरात अचानक स्फोट झाला. घरात अचानक स्फोट झाल्यामुळे मुल्ला कुटुंबीयांनाही बचावासाठी बाहेर जाण्याची संधीच मिळाली नाही. या स्फोटामुळे मुल्ला कुटूंबातील सदस्य जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

हे ही वाचा >> क्रुरतेची हद्द! जमिनीचा वाद, ट्रॅक्टरखाली 8 वेळा चिरडले, वाचवण्याऐवजी लोकं व्हिडीओ करण्यात दंग

इतर घरांच्या भिंतीचीही पडझड

या स्फोटाचा आवाज एवढा भीषण होता की, संपूर्ण मुजावर कॉलनी परिसर हादरला आहे.. या हादऱ्यात मुल्ला कुटूंबाच्या घराच्या
भिंतींचीही पडझड झाली असून परिसरातील अनेक घरांचे नुकसान झाले आहे.

नागरिकांची धावपळ

या परिसरातील साईनाथ डवरी, धोंडीराम शेलार, अशोक दिनकर पवार, आणि मोहसीन मुल्ला यांच्या घरांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या घरातील नागरिकसुद्धा जखमी झाले आहेत. अग्निशमन दलासह स्थानिक नागरिकांनी धावपळ करत आग आटोक्यात आणली. जखमींना कृष्णा रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

हे ही वाचा >> Gadchiroli : 20 दिवस, 5 हत्या! सुनेच्या खुनी खेळाने हादरला महाराष्ट्र, वाचा Inside Story

स्फोटाचं नेमकं कारण काय?

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याचे सांगितले जात असले तरी हा भीषण स्फोट व झालेले नुकसान पाहता तर्कवितर्कांना उधाण आले असून नेमका स्फोट कसा झाला याची माहिती पोलिसांकडून घेतली जात आहे.

    follow whatsapp