मुख्याध्यापकाच्या केबिनमध्येच शिक्षिकेने घेतला गळफास, नातेवाईकांचा गंभीर आरोप, अडीच वर्षांपासून सुरु होता छळ

Teacher Suicide in principal cabin : सरकारी शाळेतील एका शिक्षिकेने मुख्याध्यापकाच्या केबिनमध्येच गळफास घेतल्याचा हादरवून टाकणारा प्रकार समोर आला आहे. उत्तर प्रदेशातील बाराबंकी जिल्ह्यातील ही घटना आहे. घटनेची माहिती समजताच परिसरातील लोकांनी शाळेत गर्दी केली. गेल्या अडीच वर्षांपासून तिचे सहकारी शिक्षक तिचा मानसिक छळ करत असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.

Teacher suicide

Teacher suicide

मुंबई तक

19 Jan 2026 (अपडेटेड: 19 Jan 2026, 12:35 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

मुख्याध्यापकाच्या केबिनमध्येच शिक्षिकेने घेतला गळफास

point

नातेवाईकांचा गंभीर आरोप

Teacher Suicide in principal cabin : सरकारी शाळेतील एका शिक्षिकेने मुख्याध्यापकाच्या केबिनमध्येच गळफास घेतल्याचा हादरवून टाकणारा प्रकार समोर आला आहे. उत्तर प्रदेशातील बाराबंकी जिल्ह्यातील ही घटना आहे. घटनेची माहिती समजताच परिसरातील लोकांनी शाळेत गर्दी केली. गेल्या अडीच वर्षांपासून तिचे सहकारी शिक्षक तिचा मानसिक छळ करत असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. या शिक्षिकेला दोन मुलं असून तिचा नवराही सरकारी शाळेत शिक्षक आहे. उमा वर्मा असं ४० वर्षीय मृत शिक्षिकेचं नाव आहे.

हे वाचलं का?

हे ही वाचा : गोव्यात दोन रशियन महिलांची हत्या, एकीचा मृतदेह बाथरुममध्ये सापडला, संपूर्ण परिसरात खळबळ

अडीच वर्षांपासून उमा यांचा छळ

बाराबंकी जिल्ह्यातील हरख विकासखंड येथील कंपोजिट विद्यालय, उदवापूर या शाळेत ही घटना घडली. ४० वर्षीय शिक्षिका उमा वर्मा ह्यांना दोन मुलं असीन त्यांचे पती ऋषी वर्मा हे देखील सरकारी शाळेत शिक्षक आहेत. नातेवाईकांचा आरोप आहे की, ही आत्महत्या नसून मानसिक अत्याचाराचा हा परिणाम आहे. शिक्षिकेच्या नवऱ्याने सांगितल्यानुसार, 'गेल्या अडीच वर्षांपासून उमा यांचा मानसिक छळ केला जात होता. उमा मन लावून शिकवायची मात्र यावरुनच काही शिक्षक तिची टिंगल करायचे. तिच्याविरोधात संपूर्ण स्टाफ तक्रार करायचा.' आम्ही ट्रान्सफर करायचा प्रयत्न केला मात्र ते शक्य झालं नसल्याचंही ऋषी यांनी सांगितलं.

इतर शिक्षक करायचे टिंगल

शिक्षिकेच्या नवऱ्याचा आरोप आहे की, उमा वर्मा यांचा लटकलेला मृतदेह पाहून स्टाफ फक्त बघतच राहिला. जर वेळेतच उमा यांना उपचारासाठी नेले असते तर त्या आज जीवंत असत्या. उमा यांच्या भावाने आरोप केला की, माझी बहिण मन लावून शिकवायची. मात्र इतर शिक्षकांना ते बघवायचं नाही. तिची टिंगलटवाळी करायचे. तिला अवॉर्ड जिंकायचा आहे, असं ते म्हणायचे. ज्या केबिनमध्ये गळफास घेतला त्याचा दरवाजा आतून बंदही नव्हता.

हे ही वाचा : पुण्याहून मालेगावला निघालेल्या खासगी बसचा भीषण अपघात, 4 प्रवाशांचा मृत्यू; 22 जण जखमी

दोषी आढळल्यास कठोर कारवाई

पोलिसांना कळवण्यापूर्वीच खोलीतील वस्तू व्यवस्थित लावण्यात आल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. जिल्हा मूलभूत शिक्षण अधिकारी नवीन कुमार पाठक म्हणाले की, ही घटना अत्यंत दुःखद आहे. पोलिस सर्व बाजूंनी तपास करत आहेत. कोणत्याही स्तरावर निष्काळजीपणा किंवा दोष आढळल्यास कठोर कारवाई केली जाईल.

    follow whatsapp