गोव्यात दोन रशियन महिलांची हत्या, एकीचा मृतदेह बाथरुममध्ये सापडला, संपूर्ण परिसरात खळबळ

मुंबई तक

Goa Russian Girls Murder : गोव्यात दोन रशियन महिलांचा गळा चिरुन खून करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. यामुळे देशभर खळबळ माजली असून याप्रकरणी मूळ रशियाचा असलेला एलेक्सी लियोनोव याला गोवा पोलिसांनी अटक केली आहे. यानंतर झालेल्या चौकशीत त्याने अनेक धक्कादायक दावे केले आहेत.

ADVERTISEMENT

Goa russian murder
Goa russian murder
social share
google news

बातम्या हायलाइट

point

गोव्यात दोन रशियन महिलांची हत्या

point

एकीचा मृतदेह बाथरुममध्ये सापडला

Goa Russian Girls Murder : गोव्यात दोन रशियन महिलांचा गळा चिरुन खून करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. यामुळे देशभर खळबळ माजली असून याप्रकरणी मूळ रशियाचा असलेला एलेक्सी लियोनोव याला गोवा पोलिसांनी अटक केली आहे. यानंतर झालेल्या चौकशीत त्याने अनेक धक्कादायक दावे केले आहेत. एलेक्सीने दावा केला आहे की त्याने अजून एका महिलेची हत्या केली असून ती आसामची असल्याचे त्याने सांगितले आहे. दरम्यान, एलेक्सी हा सिरियल किलर आहे का या दृष्टीने पोलिसांनी तपास सुरु केला आहे.

हे ही वाचा : "बाय बाय डिकु, खुश राहा ..." प्रेयसीचा 'तो' मॅसेज अन् प्रियकराने संपवलं आयुष्य! दीड महिन्यांनंतर सापडली सुसाईड नोट

काय आहे संपूर्ण प्रकरण?

गोव्यातील अरंबोल येथील एका भाड्याच्या घरात 9 जानेवारी रोजी एलेना कस्थानोवा (37) या रशियन महिलेचा मृतदेह पोलिसांना आढळून आला. एफआयआर नुसार, तिचे हात बांधून आरोपीने तिचा गळा चिरला. कस्थानोवा 24 डिसेंबर रोजी गोव्यात आली होती. ती गो-गो डान्सर होती आणि मोठे समारंभ आणि लग्नात डान्सचे कार्यक्रम करायची. हा तपास सुरु असतानाच पोलिसांना एलेना वानेएवा या दुसऱ्या रशियन महिलेचा एका बाथरुममध्ये मृतदेह सापडला. तिची हत्यादेखील पहिल्या हत्येप्रमाणेच झाल्याने पोलिसांचा संशय बळावला. वानेएवा ही बबल परफॉर्मर आणि आर्टिस्ट होती. 

'असा' सापडला आरोपी

तपास सुरु असताना काही साक्षीदारांनी दिलेल्या साक्षीमुळे लियोनोवची पोलखोल झाली. कस्थानोवा आणि लियोनोवचा काही दिवसांपूर्वी वाद झाल्याचे साक्षीदारांनी सांगितले.यानंतर त्याला ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवताचा लिओनेलने कबुली दिली. कस्थानोवा ही दुसऱ्या रिलेशनशिपमध्ये असल्याचा त्याला संशय होता. या संशयातूनच तिची हत्या केल्याचे त्याने सांगितले. तर वानेएवा हिच्यासोबत त्याचा पैशांवरुन वाद झाला होता.

हे वाचलं का?

    follow whatsapp