"बाय बाय डिकु, खुश राहा ..." प्रेयसीचा 'तो' मॅसेज अन् प्रियकराने संपवलं आयुष्य! दीड महिन्यांनंतर सापडली सुसाईड नोट
एका 21 वर्षीय तरुणाने फाशी घेत आत्महत्या केल्याची बातमी समोर आली आहे. प्रेयसीमुळे आपल्या मुलाने आत्महत्या केल्याचं त्याच्या वडिलांनी तक्रारीत सांगितलं. खरं तर, दीड महिन्यांनंतर कपाटात सुरेशने लिहिलेली सुसाईड नोट सापडली.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
प्रेयसीचा 'तो' मॅसेज अन् प्रियकराने संपवलं आयुष्य!
दीड महिन्यांनंतर सापडली सुसाईड नोट
Crime News: राजस्थानच्या जालौर येथे एका 21 वर्षीय तरुणाने फाशी घेत आत्महत्या केल्याची बातमी समोर आली आहे. प्रकरणातील मृत तरुणाचं नाव सुरेश कुमार मेघवाल असून आता घटनेच्या दीड महिन्यांनंतर, सुरेशच्या वडिलांनी आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली FIR दाखल केला आहे. त्यांनी सुरेशच्या प्रेयसीवर गंभीर आरोप केले आहेत. प्रेयसीमुळे आपल्या मुलाने आत्महत्या केल्याचं त्याच्या वडिलांनी तक्रारीत सांगितलं. खरं तर, दीड महिन्यांनंतर कपाटात सुरेशने लिहिलेली सुसाईड नोट सापडली. त्यात लिहिलं की, "ठीक आहे, माझी जान... मी निरोप घेत आहे."
दीड महिन्यांनंतर सापडली सुसाईड नोट...
संबंधित प्रकरण हे आहोर पोलीस स्टेशन परिसरातील गोदन गावातील असल्याचं वृत्त आहे. 29 नोव्हेंबर 2025 रोजी घरातील पंख्याला लटकलेल्या अवस्थेत सुरेशचा मृतदेब आढळला. ते दृश्य पाहून कुटुंबियांना सुद्धा मोठा धक्का बसला. तातडीने पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. त्यानंतर, पोलिसांनी घटनास्थळी पोहचून मृतदेह ताब्यात घेतला आणि त्याचं पोस्टमॉर्टम करण्यात आलं. आत्महत्या समजून ही केस बंद करण्यात आली. मात्र, घटनेच्या दीड महिन्यांनंतर, सुरेशचे वडील त्याच्या कपाटात सामान ठेवत असताना त्यांना तिथे एक लेटर सापडलं.
ते पत्र वाचून कुटुंबियांना मोठा धक्का बसला, कारण ती सुरेशची सुसाईड नोट होती. त्यात मृत तरुणाने आपल्या पहिल्या आणि शेवटच्या प्रेमाबद्दल सांगितलं आहे. त्याने त्याच्या प्रेयसीला पत्नी मानून तिच्यासोबत भविष्याची बरीच स्वप्ने पाहिली असल्याचं त्या सुसाईड नोटमध्ये लिहिलं. इतकेच नव्हे तर, प्रेयसीसोबत बोलणं न झाल्याने तो रात्रभर रडत बसल्याचं देखील सुरेशने लिहिलं होतं. सुसाईड नोटच्या शेवटी त्याने लिहिलं की, "ठीक आहे माझी जान, आता मी निरोप घेतो, गूड बाय माय लव्ह..."
हे ही वाचा: प्रियकरासोबत पळून गेल्याचा राग; पतीने पोलीस ठाण्यातच पत्नीवर झाडली गोळी अन्...
सुरेशच्या वडिलांनी सगळंच सांगितलं
सुरेशच्या वडिलांनी पोलिसांना सांगितलं की, "माझा मुलगा ज्या मुलीवर प्रेम करायचा, तो आमच्या नात्यातीलच होती आणि त्यामुळे त्यांचं लग्न होऊ शकत नव्हतं. दोन्ही कुटुंबातील लोकांचा या नात्याला विरोध होता. सुरेशला आम्ही बऱ्याचदा समजावलं. मात्र, ती मुलगी सतत माझ्या मुलाला मॅसेज करायची. इतकेच नव्हे तर, माझी पत्नीने सुद्धा ती मुलीच्या घरी जाऊन सुरेशशी वारंवार संपर्क न करण्याचं सांगितलं होतं."










