Pune: महिलेवर पुण्यात सामूहिक बलात्कार, शिवसेनेच्या उपशहरप्रमुखाला अटक

मुंबई तक

24 Feb 2023 (अपडेटेड: 29 Mar 2023, 08:39 PM)

Solapur Crime News : शिवसेनेचे उपशहरप्रमुख विष्णू गुलाब ऊर्फ चंद्रकांत बरगंडे (रा. औसे वस्ती, आमराई, सोलापूर) याला सामूहिक बलात्कार प्रकरणी अटक करण्यात आली. सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षकांनी बरगंडेला अटक केली. त्याला न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. (Shiv Sena local Leader arrested) शिवसेना उपशहरप्रमुखाला अटक करण्यात आल्याच्या घटनेनं सोलापुरात खळबळ उडाली. विष्णू बरगंडे आणि […]

Mumbaitak
follow google news

Solapur Crime News : शिवसेनेचे उपशहरप्रमुख विष्णू गुलाब ऊर्फ चंद्रकांत बरगंडे (रा. औसे वस्ती, आमराई, सोलापूर) याला सामूहिक बलात्कार प्रकरणी अटक करण्यात आली. सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षकांनी बरगंडेला अटक केली. त्याला न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. (Shiv Sena local Leader arrested)

हे वाचलं का?

शिवसेना उपशहरप्रमुखाला अटक करण्यात आल्याच्या घटनेनं सोलापुरात खळबळ उडाली. विष्णू बरगंडे आणि मुख्य आरोपी कैलास नरळे यांनी जीवे मारण्याची धमकी देत पीडित महिलेवर पुण्यात बलात्कार केल्याचा आरोप आहे.

शिवसेना उपशहरप्रमुखाला अटक : विष्णू गुलाब ऊर्फ चंद्रकांत बरगंडेवर पीडितेने काय केला आहे आरोप?

पीडित महिलेनं चावडी पोलीस ठाण्यात विष्णू बरगंडे आणि मुख्य आरोपी गणेश कैलास नरळे या दोघांविरुद्ध तक्रार दिली होती. तक्रारीत पीडितेने म्हटलं आहे की, 31 ऑक्टोबर 2021 मध्ये विष्णू बरगंडे आणि गणेश कैलास नरळे यांनी संगनमत करून जीवे मारण्याची धमकी दिली. बदनामी करण्याची धमकी देऊन पुण्यात आळीपाळीने सामूहिक बलात्कार केला.

Crime: Instagram वरील मित्राने महिलेला विकलं; जबरदस्तीने लग्न, लैंगिक अत्याचार

पीडितेच्या फिर्यादीनंतर चावडी पोलिसांनी गणेश कैलास नरळे याला अटक केली होती. त्यानंतर चावडी पोलिसांनी गणेश कैलास नरळे याच्याविरुद्ध भादंवि कलम 417 नुसार दोषारोपपत्र न्यायालयात सादर केलं होतं.

सामूहिक बलात्कार प्रकरण : पीडितेने उच्च न्यायालयात घेतली होती धाव

दोषारोपपत्रात आरोपी विष्णू बरगंडे यास गुन्ह्यातून वगळण्याचा अहवाल पोलिसांनी न्यायालयात दाखल केला होता. त्यानंतर पीडित महिलेने अहवालाविरुद्ध उच्च न्यायालयात धाव घेतली. या प्रकरणाचा निष्पक्षपाती तपास व्हावा अशी याचिका पीडित महिलेने न्यायालयात दाखल केली होती.

पीडित महिलेच्या याचिकेची दखल घेत उच्च न्यायालयाने सदर गुन्ह्याचा तपास आयपीएस अधिकाऱ्याने करावा, असे निर्देश दिले होते. त्यानंतर राज्याच्या पोलीस महासंचालकांनी सदर प्रकरणाचा तपास सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांच्याकडे सोपवला होता.

Nashik Crime: मुंडकं छाटलं, सापडला फक्त धडासह मृतदेह.. थरकाप उडवणारी घटना

शिरीष सरदेशपांडे यांनी गुन्ह्याचा तपास करून 22 फेब्रुवारी 2023 रोजी आरोपी विष्णू गुलाब ऊर्फ चंद्रकांत बरगंडे याला अटक केली. आरोपीला प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यासमोर हजर करण्यात आलं. न्यायाधीश जयश्री काकडे यांनी आरोपी बरगंडे यास पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

    follow whatsapp