विजयकुमार बाबर, सोलापूर: सोलापूर जिल्ह्यातील कुसूर या गावी एक अत्यंत लाजिरवाणी आणि आई-मुलाच्या पवित्र नात्याला काळीमा फासणारी एक घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कुसूर गावातील ओगसिद्ध रेवणसिद्ध कोठे याचे आपल्या सख्ख्या आईसोबतच अनैतिक संबंध होते. दरम्यान, ओगसिद्ध याला स्वत:च्याच आईसोबत नको त्या अवस्थेत त्याच्या 9 वर्षीय अल्पवयीन मुलीने पाहिलं. ज्यानंतर या प्रकरणाची कुठे वाच्यता होऊ नये म्हणून ओगसिद्ध याने मुलीचा गळा दाबून हत्या केली आणि तिचा मृतदेह नजीकच्या शेतात पुरून टाकला.
ADVERTISEMENT
दरम्यान, मुलगी गायब झाल्याचं समोर आल्यानंतर याप्रकरणी मुलीच्या आईकडून पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी या सगळ्या घटनेचा तपास करत मुलीचा मृतदेह शोधून काढला. ज्यासोबत अत्यंत घृणास्पद असं प्रकरण देखील समोर आलं.
हे ही वाचा>> एक्सप्रेस वेवर महिलेला वस्त्रहिन करून नेत्याचे खुलेआम शारीरिक संबंध, सगळा प्रकार CCTV मध्ये कैद
मुलीचा मृतदेह घराशेजारी असणाऱ्या शेतात पुरण्यात आला होता. जो पोलिसांनी तहसीलदार आणि पंचांसमक्ष बाहेर काढला. त्यानंतर उत्तरीय तपासणीसाठी मुलीचा मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. या प्रकरणात मृत मुलीच्या आईने तिच्या पती आणि सासूवर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत.
'माझा नवरा आणि त्याच्या आईचे अनैतिक संबंध होते..', पत्नीचे हादरवून टाकणारे आरोप
या संपूर्ण घटनेबाबत मृत मुलीच्या आईने आणि आरोपीच्या पत्नीने माध्यमांशी बोलताना सांगितलं की, 'ते आईसोबत होते तेव्हा मुलीनं त्यांना पाहिलं. पण मुलीने पाहिल्यानंतर त्यांनी मुलीला मारहाण केली. सांगू नको म्हणून.. मला पण मारहाण करायचे. मला धमकी द्यायचा, गळा दाबायचा.. लाकूड, वीट जे काही हाती लागेल त्याने मारायचा. मी कोणालाही काही सांगू नये यासाठी पती मला मारहाण करायचा. तसंच माहेराहून पैसे घेऊन ये असंही वारंवार म्हणायचा.'
'आईसोबत काय-काय करत होते ते सगळं मुलगी सांगत होती. पती आपल्या आईसोबत नको त्या अवस्थेत होता. तेच मुलीने पाहिलं होतं. माझा नवरा माझ्या सासूसोबत (म्हणजे त्याच्या सख्ख्या आईसोबत) होता. ते पण नको त्या अवस्थेत. तेच मुलीने पाहिलं होतं. स्वत:च्या आईसोबतच माझ्या पतीचे अनैतिक संबंध होते.'
'नवरा आईसोबत झोपलेला होता हे पोरीनं पाहिलं होतं. त्यानंतर पोरीने मला सांगितलं की, पप्पाने मला मारलं.. पप्पा आजीसोबत झोपलेले पाहिले.. मी मुलीला गप्प राहायला सांगितलं. त्यानंतर नवऱ्याने मला पण बेदम मारहाण केली. तसंच जीवे मारण्याची धमकी देखील दिली.' अशी धक्कादायक माहिती महिलेने दिली.
हे ही वाचा>> MP Viral Video : एक्सप्रेस वेवर महिलेसोबत शारीरिक संबंध.. 'त्या' नेत्याचा नवा Video आला समोर
नेमकं प्रकरण काय?
ओगसिद्ध याचे स्वतःच्या सख्ख्या आईसोबत अनैतिक संबंध होते. हे त्याच्या नऊ वर्षीय मुलीने पाहिले होते. त्यामुळे ओगसिद्ध हा 9 वर्षीय मुलीला सतत मारायचा. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी ओगसिद्ध याची पत्नी हॉस्पिटलला गेलेली असताना ओगसिद्ध याने मुलीची गळा आवळून हत्या केली आणि तिचा मृतदेह नजीकच्या शेतात पुरला. असा गंभीर आरोप ओगसिद्धच्या पत्नीने केला आहे.
दरम्यान, 9 वर्षीय मुलीचा खून नेमका कशामुळे झाला यावर बोलताना पोलीस अधिकाऱ्यांनी सावध प्रतिक्रिया दिली आहे. सदर मुलीच मृतदेह हा शवविच्छेदनासाठी पाठवला असून त्याचा रिपोर्ट आल्यानंतरच मुलीच्या मृत्यूचं खरं कारण कळेल अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे.
ADVERTISEMENT
