फीसाठी पैसे नाही म्हणून विद्यार्थ्यांची आत्महत्या, जरांगे-पाटलाच्या सभेला लावलेली हजेरी!

मुंबई तक

• 01:46 PM • 21 Oct 2023

राज्यात मराठा आरक्षणाचे वादळ उठलले असतानाच अकरावीच्या मराठा समाजाच्या विद्यरार्थ्याने आत्महत्या केल्यामुळे अनेकांना धक्का बसला आहे. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने आपल्या मित्रांसोबत चर्चा करताना म्हणाला होता की, आरक्षण असते तर ही माझ्यावर परिस्थिती ओढावली नसती अशी चिंताही त्याने व्यक्त केली होती.

student suicide college due lack of money for fees, students commit suicide, attend Jarange-Patla meeting

student suicide college due lack of money for fees, students commit suicide, attend Jarange-Patla meeting

follow google news

Student Suicide: राज्यात एकीकडे मराठा आरक्षणासाठी जोरदार आंदोलन सुरु असतानाच दुसरीकडे मात्र आत्महत्या करण्याचे सत्र सुरुच असल्याचे चित्र दिसून येत आहे. मनोज जरांगे पाटील (Manoj Jarande Patil) यांच्याकडून वारंवार आणि आजच्या अकलुजच्या सभेत आरक्षणासाठी तरुणांनी आत्महत्येसारखा पर्याय निवडू नये यासाठी आवाहन केले होते. तरीही मराठा समाजातील काही तरुणांनी आत्महत्येसारखं पाऊल उचलून जीवनयात्रा संपवल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. विद्यार्थ्याने आत्महत्या (Student Suicide) करण्यापूर्वी अनेकांबरोबर आरक्षणाविषयी चर्चा केली होती. त्यावेळी त्याने आरक्षण  (Maratha Reservation) असते तर अनेक प्रश्न सुटले असते अशी भावना त्याने व्यक्त केली होती. (student suicide college due lack of money for fees, students commit suicide, attend Jarange-Patla meeting!)

हे वाचलं का?

आर्थिक परिस्थितीमुळे हतबलता

मनोज जरांगे पाटील यांनी एकीकडे राज्यातील तरुणांना आत्महत्या न करण्याचे आवाहन केलेले असतानाच दुसरीकडे हिंगोलीच्या औंढा नागनाथ तालुक्यातील दौंडगाव येथील परमेश्वर विठ्ठल चित्रे या 17 वर्षीय विद्यार्थ्याने महाविद्यालयाची फी भरण्यासाठी पैसे नसल्याने विष पिऊन आत्मत्या केली आहे. परमेश्वर चित्रेने आत्महत्या केल्याने आरक्षणाच्या प्रश्नाला आणखी धार येण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.

हे ही वाचा >> शिक्षिकेचे विद्यार्थ्याबरोबर प्रेमसंबंध, पतीला संपवण्यासाठी गाठला क्रुरतेचा कळस

वडिलांकडे नव्हते पैसे

परमेश्वर चित्रे हा विद्यार्थी संभाजीनगरमधील एका खासगी महाविद्यालयात अकरावीमध्ये शिक्षण घेत होता, मात्र महाविद्यालयाची बाकी असलेली शैक्षणिक फी भरण्यासाठी त्याच्या वडिलांकडे पैसे नव्हते. त्यामुळे तो गेल्या काही दिवसांपासून नैराश्यात होता. या नैराश्यपोटीच त्याने विष प्राशन करुन त्याने आत्महत्या केली आहे.

जरांगे पाटलांच्या आंदोलनात परमेश्वर

गेल्या काही दिवसांपासून अंतरवली सराटीमध्ये मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी आवाज उठवला आहे. त्यानंतर त्या आंदोलनावर लाठीचार्ज झाल्यानंतर ते आंदोलन प्रचंड पेटले. त्या अंतरवली सराटीमध्ये परमेश्वर चित्रे हा विद्यार्थीही सहभागी झाला होता. त्यामुळे परमेश्वर चित्रेने आत्महत्या केल्यामुळे सर्व समाजातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

हे ही वाचा >> Crime: 12 मुलांच्या आईने दिराचा प्रायव्हेट पार्टच खेचला, जागीच गेला जीव

जिल्हयावर पसरली शोककळा

परमेश्वर चित्रे याने मनोज जरांगे पाटील यांच्या सभेलाही त्याने उपस्थिती दर्शवली होती. त्यातच त्याचे शिक्षण चालू असल्यामुळे आणि परिस्थितीही मध्यम स्वरुपाची असल्याने महाविद्यालयाची फी भरणे त्याला अवघड जात होते. त्यावरून तो आत्महत्या करण्यापूर्वी काही दिवस आधी मराठा समाजाला आरक्षण असतं तर एवढी फी भरायला लागली नसती अशी भावना त्याने त्याचे मित्र आणि नातेवाईकांकडे व्यक्त केले होते. मात्र त्याच्याकडे सध्या महाविद्यालयाची फी भरण्यासाठी पैसे नसल्यामुळे त्याने विष प्राशन करुन आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात शोककळा पसरली आहे.

    follow whatsapp