वडिलांनीच झाडल्या 25 वर्षीय मुलीवर गोळ्या, राधिका यादवची का केली हत्या?

Tennis Player Radhika Yadav Murder: गुरुग्राममध्ये येथील राज्यस्तरीय टेनिसपटू राधिका यादव हिची तिच्या वडिलांनीच हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तब्बल 3 गोळ्या झाडत त्यांनी मुलीची हत्या केली.

टेनिसपटू राधिका यादवची हत्या (फाइल फोटो)

टेनिसपटू राधिका यादवची हत्या (फाइल फोटो)

मुंबई तक

10 Jul 2025 (अपडेटेड: 10 Jul 2025, 11:53 PM)

follow google news

गुरूग्राम: हरियाणातील गुरुग्राममध्ये एका राज्यस्तरीय टेनिसपटूची तरूणीची गोळी झाडून हत्या केल्याचं धक्कादायक वृत्त नुकतंच हाती आलं आहे. भयंकर गोष्ट म्हणजे टेनिसपटू तरुणीच्या वडिलांनीच तिच्यावर गोळ्या झाडल्या आहेत. आपल्या परवानाधारक पिस्तूलमधून वडिलांनी तीन गोळ्या झाडून मुलीची हत्या केली. मृत खेळाडूचे नाव राधिका यादव असे आहे. ती राज्यस्तरीय टेनिसपटू होती. ही घटना त्यांच्या घरातच घडली. सुशांत लोक फेज 2 मधील G ब्लॉकमधील  घरातच वडिलांनी मुलीवर गोळ्या झाडून हत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी वडिलांना अटक केली आहे. 

हे वाचलं का?

नेमकं काय घडलं?

गुरुवारी (10 जुलै) सकाळी 10.30 वाजेच्या सुमारास 25 वर्षीय टेनिसपटू राधिका याद हिच्या वडिलांनी तिच्यावर गोळी झाडली. राधिका यादव ही येथील सेक्टर 56 मधील पहिल्या मजल्यावर तिच्या कुटुंबासह राहत होती. तीन गोळ्या झाडल्यानंतर, राधिकाला गंभीर अवस्थेत एका खाजगी रुग्णालयात नेण्यात आले. जिथे उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

हे ही वाचा>> "बाबा आणि काका कामावर गेल्यावर मम्मी आणि काकी मुलांना बोलावतात अन्...', मी पाहिलं होत पण...

टेनिस अकादमी चालवायची राधिका

राधिका ही एक प्रसिद्ध राज्यस्तरीय खेळाडू होती. तिने अनेक पदके जिंकली होती. ती एक टेनिस अकादमी देखील चालवत होती, जिथे ती इतर मुलांना टेनिस शिकवत होती. टेनिसपटूची हत्या का करण्यात आली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. गुरुग्राम सेक्टर ५६ च्या पोलिस अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, त्यांना गुरुवारी सकाळी 25 वर्षीय महिलेची हत्या झाल्याची माहिती मिळाली.

हे ही वाचा>> मासिक पाळी तपासण्यासाठी विद्यार्थीनींना केलं विवस्त्र, पालकांनी जाब विचारत केला संताप व्यक्त, नेमकं काय घडलं?

घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी मुलीच्या काकांकडे याबाबत चौकशी, परंतु त्यांनी काहीही माहिती दिली नाही. पोलिसांनी हत्येत वापरलेले रिव्हॉल्व्हर जप्त केले आहे.

रील बनवण्यावरून झाला वाद?

मीडिया रिपोर्ट्सनुसार, राधिका यादव आणि तिच्या वडिलांमध्ये रील बनवण्यावरून वाद झाला होता. त्यानंतर वडिलांनी मुलीची हत्या केली. 23 मार्च 2000 रोजी जन्मलेल्या राधिकाचे दुहेरी आयटीएफ रेटिंग 113 होते. ती दीर्घकाळ आंतरराष्ट्रीय टेनिस फेडरेशनच्या क्रमवारीत टॉप-200 मध्ये राहिली आहे.

    follow whatsapp