Thane Crime : डोंबिवलीतील 21 वर्षीय तरुणाने इमारतीच्या 11 व्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ऋषिकेश शर्विल परब (वय 21) आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव आहे. दरम्यान, तरुणाच्या आत्महत्येमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. दरम्यान, 21 वर्षीय ऋषिकेश परबने आत्महत्या का केली? याबाबत जाणून घेऊयात..
ADVERTISEMENT
मैत्रिणीसोबत वाद झाल्यानंतर तरुणाने आयुष्य संपवलं
अधिकची माहिती अशी की, डोंबिवलीत वंदे मातरम कॉलेजचा विद्यार्थी ऋषिकेश शर्विल परब (वय 21) या तरुणाने राहत्या इमारतीच्या 11 व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. मैत्रिणीसोबत वाद झाल्यानंतर त्याने टोकाचा निर्णय घेतला आणि आत्महत्या केली आहे. दरम्यान, त्याच्या उडी मारतानाचं दृश्य पाहून परिसरातील लोकांनी हळहळ व्यक्त केलीये. ऋषिकेश परब हा इमारतीतील 5 व्या मजल्यावर राहात होता. मात्र, त्याने 11 व्या मजल्यावर जात उडी मारली आणि आयुष्याचा शेवट केलाय.
हेही वाचा : धाराशिवच्या जिल्हाधिकाऱ्यांचा डान्स व्हिडीओ व्हायरल, कैलास पाटील संतापले; काँग्रेसकडून बडतर्फ करण्याची मागणी
तरुणाने 11 व्या मजल्यावरुन मारली उडी
21 वर्षीय ऋषिकेश परब तो राहात असलेल्या सोसायटीत सकाळी 8 वाजल्यापासून बसलेला होता. प्राथमिक तपास केल्यानंतर मैत्रिणीसोबत झालेल्या वादातून त्याने हे पाऊल उचलल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. परब 5 व्या मजल्यावर राहात होता, मात्र त्याने थेट 11 व्या मजल्यावर जाऊन फायर डक मधून उडी घेतली. सकाळी 11.46 वाजता घटनेची माहिती अग्निशमन दलाला देण्यात आली. मात्र, अग्निशमन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचल्यावर काही वेळातच, दुपारी सुमारे 12 वाजता ऋषिकेशने उडी घेतली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. ऋषिकेश वंदे मातरम कॉलेजमध्ये शिक्षण घेत होता. घटनेनंतर पोलिसांनी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे.
ADVERTISEMENT
