धाराशिवच्या जिल्हाधिकाऱ्यांचा डान्स व्हिडीओ व्हायरल, कैलास पाटील संतापले; काँग्रेसकडून बडतर्फ करण्याची मागणी
धाराशिवचे जिल्हाधिकारी IAS Keerthi Kiran Pujar यांना बडतर्फ करण्यात यावं, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

धाराशिवच्या जिल्हाधिकाऱ्यांना बडतर्फ करा, हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी

जिल्हाधिकाऱ्याच्या डान्स व्हिडीओवरुन कैलास पाटलांनीही सुनावलं
Dharashiv : धाराशिव जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्यात आलेल्या महापूरामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसलाय. अतिवृष्टीमुळे शेतकरी हवालदिल झालेला असताना धाराशिवचे जिल्हाधिकारी मात्र, नाचगाण्यात मग्न असल्याचं पाहायला मिळालंय. धाराशिवचे जिल्हाधिकारी Keerthi Kiran Pujar यांनी तुळजापूर सांस्कृतिक महोत्सवात तुफान डान्स केलाय. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून सामान्य लोक त्यांच्या कृतीमुळे संताप व्यक्त करत आहेत. यावर आता ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. शिवाय, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी धाराशिवच्या जिल्हाधिकाऱ्यांना बडतर्फ करण्याची मागणी केली आहे.
बेजबाबदारपणे वर्तन करणे, ही महाराष्ट्रासाठी दुर्दैवाची गोष्ट - कैलास पाटील
कैलास पाटील म्हणाले, धाराशिव जिल्ह्यात महापूर आलाय. यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. शेतकऱ्यांचं जे नुकसान झालंय, त्याचे 100 टक्के पंचनामे अजून पूर्ण झालेले नाहीत. अ-ब-क-ड स्वरुपात ही माहिती शासनाकडे द्यावी लागते. ही माहिता देखील अद्याप शासनाकडे पोहोचलेली नाही. अशा परिस्थितीत हे सगळं पूर्ण करणे. शेतकऱ्यांना धीर देणे, हे जिल्हा प्रशासनातील प्रमुख अधिकाऱ्यांचं आहे. अशा काळात बेजबाबदारपणे वर्तन करणे, ही महाराष्ट्रासाठी दुर्दैवाची गोष्ट आहे. जिल्हाधिकाऱ्यांचे हे वर्तन शासनाचं वर्तन समजलं जातं. त्यामुळे जबाबदारीने वागणे, हे अधिकाऱ्यांचं कर्त्यव्य असतं.