पत्नी-पत्नीमधील वाद टोकाला पोहोचला! पत्नीची निर्घृण हत्या अन् पुरावे मिटवण्यासाठी घरात लावली आग...

भारतीय रिजर्व बटालियन (IRB)मध्ये कार्यरत असणाऱ्या एका जवानाने आपल्या पत्नीची हत्या केली आणि नंतर, ती घटना अपघात असल्याचं दाखवण्याचा प्रयत्न केला.

पुरावे मिटवण्यासाठी घरात लावली आग...

पुरावे मिटवण्यासाठी घरात लावली आग...

मुंबई तक

• 11:40 AM • 11 Oct 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

पत्नी-पत्नीमधील वाद टोकाला पोहोचला

point

पुरावे मिटवण्यासाठी घरात लावली आग...

Crime News: पतीनेच आपल्या पत्नीची निर्घृणपणे हत्या केल्याची बातमी समोर आली आहे. भारतीय रिजर्व बटालियन (IRB)मध्ये कार्यरत असणाऱ्या एका जवानाने आपल्या पत्नीची हत्या केली आणि नंतर, ती घटना अपघात असल्याचं दाखवण्याचा प्रयत्न केला. शिव शंकर पात्रा असं आरोपी तरुणाचं नाव असून मृत महिलेचं नाव प्रियंका असल्याचं सांगण्यात येत आहे. पोलिसांनी प्रकरणातील आरोपीला अटक केली आहे. ही धक्कादायक घटना ओडिशाच्या कोरापुट टाउमधील ओएमपी कॉलनीत घडल्याचं समोर आलं आहे. 

हे वाचलं का?

पती आणि पत्नीमधील वाद टोकाला पोहोचला 

पोलिसांच्या माहितीनुसार, 8 ऑक्टोबरच्या रात्री आरोपी पती आणि पीडित पत्नीमध्ये काही कारणावरून वाद झाला. हा वाद इतका टोकाला पोहोचला की शिव शंकरने रागाच्या भरात लोखंडी रॉडने आपल्या पत्नीच्या डोक्यावर वार केला. त्यावेळी, पीडिता जागीच बेशुद्ध झाली. त्यानंतर, आरोपी पतीने पुरावे मिटवण्यासाठी गॅस सिलेंडरची पाइप खोलून घरात आग लावली आणि ही पत्नीची हत्या एक सामान्य अपघात असल्याचं दाखवण्याचा प्रयत्न केला. 

आग लागल्याच्या काही मिनिटांनंतर शिव शंकर शेजाऱ्यांसोबत त्याच्या घरी पोहोचला आणि आपल्या पत्नीला वाचवण्याचं नाटक करू लागला. फायर ब्रिगेडच्या टीमने घरातील आग विझवली आणि त्यानंतर, प्रियंकाचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला. त्यावेळी, पोलिसांनी घटनास्थळाचा तपास केला असता तिथे बरेच संशयास्पद पुरावे आढळले, ज्यावरून ही घटना एक सामान्य अपघात नसून हत्या असल्याचं समोर आलं. 

हे ही वाचा: ओला, उबर अशा अ‍ॅप आधारित टॅक्सी सेवांसाठी 'हा' नवा नियम लागू... राज्य सरकारचा मोठा निर्णय! आता भाड्याचे दर सुद्धा...

पीडितेच्या वडिलांनी दाखल केली तक्रार 

कोरापुट टाउन पोलिसांनी आरोपी पतीची चौकशी केली असता त्याच्या जबाबात बऱ्याच संशयास्पद बाबी समोर आल्या. अखेर, कठोर चौकशीदरम्यान आरोपीने त्याचा गुन्हा कबूल केला. पोलिसांनी आरोपी पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू असल्याचं सांगितलं जात आहे. 

हे ही वाचा: Heart Attack ने कामगार तडपत राहिला, सगळं पाहूनही दुकानाचा मालक मोबाईलमध्ये मग्न, शेवटी व्हायचं तेच झालं

पोलिसांच्या माहितीनुसार, मृत महिलेच्या वडिलांनी पोलिसात यासंबंधी तक्रार दाखल केली असून तक्रारीच्या आधारे आरोपी तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. कौटुंबिक वादामुळे आरोपीने हे टोकाचं पाऊल उचलल्याचं पोलिसांच्या तपासात समोर आलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने आपल्या पत्नीच्या डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला केला आणि नंतर गॅस सिलेंडरची पाइन उघडून घरात आग लावली. त्यानंतर, आरोपीने ही घटना एक अपघात असल्याचं दाखवण्याचा प्रयत्न केला. 

    follow whatsapp