नवरा-बायकोचं भयंकर कृत्य, वृद्ध महिलेचे पायच टाकले कापून अन्...

एक विवाहित जोडपे एका 60 वर्षीय महिलेला निर्जन ठिकाणी घेऊन गेले आणि त्यावेळी महिलेने तिचा गळा दाबला. तसेच, आरोपी महिलेच्या पतीने पाइप कापण्याच्या करवतीने पीडितेचे दोन्ही पाय कापून टाकले.

 60 वर्षांच्या वृद्ध महिलेला निर्जनस्थळी नेलं अन्...

60 वर्षांच्या वृद्ध महिलेला निर्जनस्थळी नेलं अन्...

मुंबई तक

10 Oct 2025 (अपडेटेड: 10 Oct 2025, 12:42 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

रात्री अडीच वाजता वृद्ध महिलेला निर्जनस्थळी नेलं

point

60 वर्षीय वृद्ध महिलेसोबत केलं भयंकर कृत्य...

Crime News: राजस्थानमध्ये रात्री अडीच वाजता घडलेल्या एका घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. येथे येथे एक विवाहित जोडपे एका 60 वर्षीय महिलेला निर्जन ठिकाणी घेऊन गेले आणि त्यावेळी महिलेने तिचा गळा दाबला. तसेच, आरोपी महिलेच्या पतीने पाइप कापण्याच्या करवतीने पीडितेचे दोन्ही पाय कापून टाकले आणि वृद्ध महिलेचे चांदीचे कडे घेऊन फरार झाले. सकाळी, रस्त्याने जाणाऱ्या स्थानिकांना झुडपांमधून महिलेच्या ओरडण्याचा आवाज ऐकू आला. त्यावेळी त्यांनी पीडितेला अतिशय जखमी अवस्थेत पाहिलं. 

हे वाचलं का?

पीडित महिलेचे पाय कापलेले होते आणि त्यातून प्रचंड रक्तस्त्राव होत होता. स्थानिकांनी हे भयानक दृश्य पाहून त्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी प्रकरणाचा तपास करण्यास सुरूवात केली. तपासादरम्यान, केवळ पाच तासांतच प्रकरणातील आरोपी जोडप्याला अटक करण्यात आली.

आरोपींना केली अटक   

अटक झालेल्या आरोपी पुरुषाचं नाव राम अवतार आणि महिलेचं नाव तनु उर्फ सोनिया असल्याचं समोर आलं. दोन्ही पती-पत्नी सध्या पोलिसांच्या ताब्यात असल्याची माहिती आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी राम अवतार हा रामगढचा रहिवासी असून त्याला यापूर्वी सुद्धा एका गुन्ह्याखाली अटक करण्यात आली होती. एक महिन्यापूर्वीच त्याची तुरुंगातून सुटका झाल्याचं सांगितलं जात आहे. घटनेनंतर, पीडित वृद्ध महिलेने तातडीने एसएमएस रुग्णालयात नेण्यात आलं मात्र, उपचारांसाठी उशीर झाल्याकारणाने तिचे पाय डॉक्टरांना जोडता येऊ शकले नाहीत. 

दोन्ही पाय कापून टाकले अन्...

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, आरोपी राम अवतारने त्याची पत्नी तनुसोबत मिळून, बामनवास येथील सिताौर की धानी येथे राहणाऱ्या कमला (60) नावाच्या पीडित महिलेला काम देण्याचं आमिष दाखवलं आणि त्याने तिला आपल्या भाड्याच्या घरात नेलं. त्यानंतर, मध्यरात्री जवळपास 2.30 ते 3 वाजताच्या सुमारास, आरोपी तिला एका निर्जन ठिकाणी घेऊन गेले आणि त्याच्या पत्नीने वृद्ध महिलेचा गळा दाबला तसेच, आरोपी तरुणाने पाइप कापणाऱ्या करवतीने तिचे दोन्ही पाय कापले. दरम्यान, आरोपींनी पीडितेच्या पायातील चांदीचे कडे सुद्धा चोरले. 

हे ही वाचा: पुण्यात ATS आणि पोलिसांची प्रचंड मोठी कारवाई, 'त्या' 18 जणांचा नेमका काय होता प्लॅन?

घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि प्रकरणाच्या तपासादरम्यान, दुपारी 1 वाजताच्या सुमारास आरोपीला अटक करण्यात आली. आरोपींनी कडे विकून मिळवलेले पैसे सुद्धा पोलिसांनी जप्त केले. तसेच, प्रकरणात सोनाराची भूमिकेचा तपास घेतला जात आहे. 

हे ही वाचा: Personal Finance: Gold फंडमध्ये जबरदस्त पैसा, हे 5 Fund गुंतवणुकीसाठी बेस्ट!

रात्रभर वेदनादायी अवस्थेत 

ही घटना रात्री अडीच वाजताच्या सुमारास घडली. त्यानंतर, सकाळी 8 वाजताच्या सुमारास ट्रॅक्टर-ट्रॉली चालकांनी महिलेला वेदनादायी अवस्थेत पाहिलं आणि तिचे फोटो शेअर केले. त्यानंतर, पोलिसांना सुद्धा याबद्दल माहिती देण्यात आली आणि पोलीस घटनास्थळी पोहोचले. सवाईमाधोपूर येथील एफएसएल टीमनेही घटनास्थळावरील पुरावे गोळा केले. पीडितेची सून सीता या प्रकरणाबाबत म्हणाली की तिची सासू बराच काळ घरी न परतल्याने त्यांनी तिचा शोध घेण्यास सुरूवात केली, परंतु ती सापडलीच नाही. त्याच संध्याकाळी त्यांनी सदर पोलिस ठाण्यात महिलेच्या अपहरणाचा एफआयआर दाखल केला.

    follow whatsapp