Crime News : इंटरनेशनल इंस्टीट्यूट ऑफ इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी या महाविद्यालयात AI ची मदत घेऊन विद्यार्थिनीचे अश्लील फोटो तयार करण्यात आले आहेत. या प्रकरणात महाविद्यालयीन प्रशासनाने पाऊल उचलत आरोपी विद्यार्थ्याविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. ही घटना छत्तीसगड जिल्ह्यातील रायपूर येथील असल्याचं सांगण्यात येत आहे. या प्रकरणात आरोपी विद्यार्थी सय्यद रहीम अदनान अलीला पोलिसांनी अटक केली आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : बीड हादरलं! ग्रामस्थांनी 'त्या' कारणावरून महिलेला रक्तबंबाळ होईपर्यंत केली मारहाण, हादरवून टाकणारं प्रकरण समोर
36 विद्यार्थिनींच्या फोटोंचे पोर्नोग्राफिक फोटो बनवले
संबंधित प्रकरणात काही माहिती समोर आली त्याआधारे आरोपी विद्यार्थी सय्यद रहीम अदनान अलीने त्याच्या 36 विद्यार्थिनींच्या फोटोंचे पोर्नोग्राफिक फोटो बनवले. हे फोटो बनवण्यासाठी एआय टूल्सचा वापर करत, अक्षेपार्ह स्थितीत डिजिटल पद्धतीने तयार करण्यात आल्या होत्या.
महाविद्यालय प्रशासन घटनेची माहिती त्यांनी ताबडतोबपणे अंतर्गत चौकशी समिती स्थापन कली. एकूण तपासातून विद्यार्थ्यानेच गुन्हा केल्याचे आता उघड झाले आहे. नंतर संस्थेने राखी पोलीस ठाण्यात संपूर्ण अहवाल सादर करत आरोपींवर कायदेशीर कारवाईची मागणी केली.
आरोपी विरोधात आयटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
या प्रकरणात पोलिसांनी आरोपी विरोधात आयटी कायद्यांतर्गत कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. त्यांनी त्याचा लॅपटॉप, मोबाईल फोन आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे दाखल करत जप्त करण्यात आली आणि पुढील तपास करण्यात आला. हे बनावट फोटो इतरत्र शेअर करण्यात आले आहेत. याप्रकरणाबाबत पोलीस पुढील शोध घेत आहेत.
हे ही वाचा : अनोळखी मुलासोबत झाली ओळख आणि तरुणी 2 आठवड्यानंतर राहिली गरोदर, अन् पुढे...
संबंधित प्रकरणात आरोपी विद्यार्थ्याविरोधात कठोर कारवाई केली जाते. तसेच पोलीस या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी काम करत आहेत. महाविद्यालयीन प्रशासनाने सांगितलं की, कोणत्याही बेकायदेशीर कृत्य केले जाणार नाही.
ADVERTISEMENT
