Crime News : दिल्लीतील कोटला मुबारकपूर परिसरातील भाड्याच्या घरात राहणाऱ्या एका तरुणीच्या खून प्रकरणात मोठा खुलासा झालाय. पोलीस तपासानंतर या प्रकरणातील मोठं गुढ उकललं आहे. या प्रकरणात पोलिसांनी 8 ऑक्टोबर रोजी हरियाणातील हांसी येथून संशयित प्रियकर हिमांशु याला अटक केली. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली देत सांगितले की, त्याने आपल्या प्रेयसीच्या मोबाईलमध्ये दुसऱ्या युवकासोबतचे फोटो पाहिल्याने संतापाच्या भरात तिला चाकूने भोसकले.
ADVERTISEMENT
डीसीपी अंकित चौहान यांनी दिलेल्या माहितीनुसार, 7 ऑक्टोबरच्या संध्याकाळी कोटला मुबारकपूर पोलिसांना प्रताप गल्लीत एका घराच्या पायऱ्यांवर रक्त सांडल्याची माहिती मिळाली. पोलिस घटनास्थळी पोहोचले असता, पहिल्या मजल्यावरील खोलीत 25 वर्षीय साक्षी गुरूंग ही रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली. तिच्या चेहऱ्यावर, मानेला आणि खांद्यावर चाकूचे गंभीर घाव होते. तिला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. तपासात साक्षी ही त्या घरात एकटीच राहत असल्याचे आणि तिचे आई-वडील निधन पावल्याचे समोर आले.
हेही वाचा : 40 लोकांना अश्लील मॅसेज पाठवण्यात आल्याचा दावा, अमरावतीतील माजी न्यायाधीशाकडून 31 लाख रुपये लुबाडले अन्...
हत्याकांड उघडकीस आणण्यासाठी एसीपी ऑपरेशन अरविंद कुमार यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करण्यात आले. परिसरातील सीसीटीव्ही फूटेज तपासल्यानंतर आरोपी हरियाणाला जात असल्याचे आढळले आणि त्याची ओळख पटली.
हिमांशुने पोलिसांना सांगितले की, सुमारे चार महिन्यांपूर्वी त्याची आणि साक्षीची भेट राजस्थानच्या जोधपूरमध्ये झाली होती. ओळख हळूहळू प्रेमात बदलली, मात्र साक्षीचा आधीही एका युवकासोबत संबंध होता, याबद्दल हिमांशु संशयात राहत असे. यावरून त्यांच्यात अनेकदा वाद होत असत. 7 ऑक्टोबर रोजी मोबाईलमधील फोटो पाहून तो संतापला आणि साक्षीवर चाकूने हल्ला केला.
तपासात उघड झाले की 25 वर्षीय हिमांशु हा ढाणा खुर्द गावचा रहिवासी असून शिक्षण दहावीनंतर त्याने सोडले होते. त्याच्यावर तब्बल 14 गुन्हे दाखल असून तो हरियाणातील गुंडांच्या जीवनशैलीने प्रभावित होता. तो अनेक गॅंगस्टर्सना सोशल मीडियावर फॉलो करत असे आणि त्यांचे पोस्ट शेअर करत असे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT
