Crime News : मध्यप्रदेशातील इंदुरमधून अंगावर काटा आणणारी आणि अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे. नवविवाहितेने पाच वर्षांचा चिमुकला मांडीवर असताना स्वत:वर अॅसिड टाकून घेतल्याची घटना घडलीये. सुमन असं स्वत:वर अॅसिड ओतून घेणाऱ्या महिलेचं नाव आहे. घटना घडली त्यावेळी आई आणि पाच वर्षांचा चिमुकला दोघेच घरात होते. अॅसिड टाकून घेतल्यामुळे दोघेही गंभीरपणे जखमी झाले होते. कुटुंबियांना समजताच त्यांनी दोघांनाही रुग्णालयात नेले. परंतु गुरुवारी रात्री मुलाचा आणि शुक्रवारी सकाळी आईचा मृत्यू झाला. हा प्रकार राऊ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विहार कॉलनीत घडला. ही घटना गुरुवारी संध्याकाळी सुमारे 6 वाजताच्या सुमारास घडली, तर पोलिसांना याबाबतची माहिती रात्री 9 वाजता रुग्णालयाकडून मिळाली.
ADVERTISEMENT
माहितीनुसार, कैलाश पटेल आपल्या कुटुंबासह येथे राहतात. 23 वर्षीय सुमन यांनी आपल्या 5 महिन्यांच्या मुलावर पहिल्यांदा अॅसिड टाकले. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, त्यांचा विवाह तीन वर्षांपूर्वी झाला होता. सुमन बहुतेक वेळा घरातच असायची. घटनेनंतर परिसरात आणि कुटुंबात शोकाचे वातावरण पसरले आहे.
प्राथमिक चौकशीतून समजले की, घटना घडताना सुमन घराच्या मागील खोलीत एकटी होती. कैलाश रोजच्या प्रमाणे फॅक्टरीत कामाला गेले होते, तर सासू -सासरे कुठल्या तरी नातलगाच्या घरी गेले होते. सुमारे 3 तासांनी कुटुंब परतले, पण सुमनने दरवाजा उघडला नाही. प्रथम कुटुंबीयांना वाटले की ती मुलासोबत झोपलेली असेल. अनेकदा बोलावूनही प्रतिसाद न मिळाल्यावर त्यांनी दरवाजा तोडला. दरवाजा उघडल्यानंतर आतले दृश्य पाहून सर्वजण स्तब्ध झाले. महिला आणि बाळ गंभीरपणे जखमी होते. कौटुंबिक वाद हे आत्महत्येमागील खरं कारण असल्याची चर्चा परिसरात रंगली आहे. राऊ पोलिसांनी प्रकरण नोंदवून दोघांचे पोस्टमार्टम केले आहे. सध्या पोलिस या प्रकरणाची चौकशी करत आहेत, तसेच सुमनच्या माहेरच्या कुटुंबियांचीही विचारपूस केली जाणार आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT
