Crime News : एका शिक्षिकेवर चार तरुणांनी लैंगिक शोषण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पीडितेचं लैंगिक शोषण झाल्यानंतर तिने गुरुवारी पोलीस ठाणे गाठून नराधम्यांविरोधात तक्रार दाखल केली. गुन्हा दाखल केलेल्या पोलिसांनी शुक्रवारी चारही जणांना अटक केली, त्यानंतर शनिवारी न्यायालयात हजर केले होते. हे चारही तरुण एकाच जीममध्ये प्रशिक्षक म्हणून काम करतात आणि झुम्बाचे प्रशिक्षणंही देतात. ही घटना गुरुग्राममधील असल्याचं सांगण्यात येत आहे. हिमाचल प्रदेशचा आरोपी गौरव, नारनौलचे रहिवासी योगेश आणि अभिषेक तसेच उत्तर प्रदेशातील रहिवासी नीरज अशी आरोपी तरुणांची नावे समोर आली आहेत.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : दोन मुली इमारतीत खेळत असताना इस्टेट एजंट करू लागला अश्लील चाळे, धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद
शिक्षिकेनं तक्रारीत काय म्हटलं?
पीडित महिला शिक्षिकेनं पोलिसांना दिलेल्या एका तक्रारीत म्हटलं की, ती तिच्या कुटुंबासह गुरुग्राममध्ये राहते. ती एका खासगी शाळेत परदेशी भाषा शिकवते. तिने सांगितलं की, तिची एका गौरव नावच्या तरुणाशी मैत्री झाली होती. नंतर त्यांनी एकमेकांचा मोबाईल नंबर घेत बोलून लागल्याचे तिनं सांगितलं. त्यानंतर ती 1 ऑक्टोबर रोजी दिल्लीतील एका पार्टीवरून परतत असताना गौरव 1 वाजण्याच्या सुमारास संपर्क साधू लागला. नंतर ती महिला गौरवला ठाणे पूर्व भागात भेटली.
संधी साधून शिक्षिकेवर बलात्कार
गौरवने तिला त्याचा मित्र नीरजच्या खोलीत नेले. त्यानंतर पहाटे 2 वाजेच्यादरम्यान तिथे कोणीही नव्हते. गौरवने संधी साधून तिच्यावर बलात्कार केला. नंतर त्याने त्याच्या मित्र नीरजला फोनद्वारे संपर्क केला, त्यानेही तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर गौरव आणि नीरजने त्यांचे मित्र अभिषेक आणि योगेशला फोनद्वारे संपर्क केला असता, त्यांनी महिला शिक्षिकेवर बलात्कार केला. नंतर पीडितेनं वारंवार प्रतिकार केला पण, तिचं कोणीही ऐकलं नाही.
हे ही वाचा : मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुन्हा मातोश्रीवर, दोन्ही भावांमध्ये नेमकी चर्चा काय?
या सामूहिक बलात्कारानंतर, भयभीत झालेली महिला शिक्षका 2ऑक्टोबर रोजी सकाळी कशीबशी तिच्या घरी सुखरूप पोहोचली. त्यानंतर ती ठाणे पूर्ण भागात गेली आणि महिला पोलिसांनी तिच्यावर झालेल्या अत्याचाराबाबतचा धक्कादायक अनुभव सांगितला. संबंधित प्रकरणात महिलेच्या तक्रारीवरून विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि चारही आरोपींना अटक केली आहे.
ADVERTISEMENT
