माझ्या बहिणीचे कपडे फाडले, मी काहीच करु शकलो नाही; ITBP अधिकाऱ्याची काळजाचं पाणी करणारी सुसाईड नोट

Crime News : माझ्या बहिणीचे कपडे फाडले, मीच काहीच करु शकलो नाही; ITBP अधिकाऱ्याची काळजाचं पाणी करणारी सुसाईड नोट

Mumbai Tak

मुंबई तक

11 Oct 2025 (अपडेटेड: 11 Oct 2025, 11:52 AM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

माझ्या बहिणीचे कपडे फाडले, मीच काहीच करु शकलो नाही

point

ITBP अधिकाऱ्याची काळजाचं पाणी करणारी सुसाईड नोट

Crime News : “मी माझं जीवन संपवत आहे. कारण ललमटियाच्या फौजदाराने माझ्या बहिणीचे केस धरून तिला फरफटत नेले. तिचे कपडे फाडले आणि तिला अर्धनग्न केले. मी तिला सुरक्षित ठेवू शकलो नाही. माझ्या मृत्यूचा जबाबदार ललमटियाचा फौजदार राजीव रंजन आहे.”, अशी काळजाचं पाणी करणारी सुसाईड नोट लिहित आईटीबीपीमधील अधिकारी आयुष दीपक यांनी आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. आत्महत्या केलेल्या आयुष दीपक यांनी लिहिलेली सुसाईड नोट अखेर पोलिसांच्या हाती लागली आहे. सुसाईड नोट वाचून कोणाच्याही काळजाचं पाणी झाल्याशिवाय राहाणार नाही.

हे वाचलं का?

खरं तर, आयटीबीपीचे अधिकारी आयुष दीपक पंजाबच्या पटियाला येथे तैनात होते. आत्महत्येची नोट समोर आल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. पटियालामध्ये 4 ऑक्टोबर रोजी आयुषने गळफास घेऊन आपले जीवन संपवले. पटियालामध्ये मृतकाचा मेव्हणा आकाश जैनच्या तक्रारीवर गुन्हा नोंदवण्यात आलाय, ज्यात भागलपूर पोलिसांवर गंभीर आरोप झाले होते. दरम्यान, या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर या प्रकरणाची चौकशी सुरु करण्यात आली आहे. आता पटियाला पोलीस लवकरच राजीव रंजनला अटक करु शकतात, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.

हेही वाचा : पत्नी-पत्नीमधील वाद टोकाला पोहोचला! पत्नीची निर्घृण हत्या अन् पुरावे मिटवण्यासाठी घरात लावली आग...

आत्महत्येच्या नोटमध्ये आणखी काय लिहिले आहे?

सुसाईड नोटनुसार, बहिणीशी फौजदाराने केलेल्या दुराचारामुळे आयटीबीपीचे अधिकारी आयुष दीपक आत्महत्या केली. नोटमध्ये मृत्यूची जबाबदारी ठाणे प्रमुखावर टाकत संपूर्ण घटनाक्रम स्पष्ट केला आहे. आयुषने लिहिले आहे – “मी माझं जीवन संपवत आहे. कारण भागलपूरच्या ललमटियाचा फौजदार राजीव रंजन, जो सध्या बांका येथील विक्रमशिला ठाण्यात कर्त्यव्यावर आहे, तो माझ्या मृत्यूला जबाबदार आहे. राजीव रंजन माझ्या बहिणीचे केस धरून तिला फरफटत नेले. तिचे कपडे फाडून तिला अर्धनग्न केले.

...माझ्या बहिणीची एवढीच चूक होती

आयुष यांनी पुढे लिहिले , “माझ्या बहिणीने फक्त एवढे सांगितले होते की, पासी टोला, कबीरपूर रोड, नाथनगर येथे महिलांना आणि मुलांना मारू नका. त्यानंतर राजीव रंजनने केवळ माझ्या बहिणीसह दुराचार केला नाही, तर तिच्यावर खटला नोंदवला. मी एक सशस्त्र सेवेचा सदस्य असूनही माझ्या बहिणी ज्योतीला सुरक्षित ठेवू शकलो नाही. मला यामुळे अस्वस्थ वाटत आहे. मी निराश झालोय. अगदी एसएसपीला केलेला कॉलही निरर्थक ठरला.”

प्रकरणावर SSP हृदय कांत काय म्हणाले?

या प्रकरणावर SSP हृदय कांत म्हणाले – “हे चार महिन्यांपूर्वीचं प्रकरण आहे. कॉल आला असण्याची शक्यता आहे. घटनेनंतर अनेक कॉल येतात, मी संबंधित डीएसपीला तपासाची जबाबदारी दिली होती. पटियालामध्ये झालेल्या प्रकरणाची तपासणी पोलिस करत आहेत. आता सिटी एसपीला तपासाची जबाबदारी देण्यात आली आहे.”

इतर महत्त्वाच्या बातम्या 

ओला, उबर अशा अ‍ॅप आधारित टॅक्सी सेवांसाठी 'हा' नवा नियम लागू... राज्य सरकारचा मोठा निर्णय! आता भाड्याचे दर सुद्धा...

 

    follow whatsapp