17 वर्षीय तरूणीवर अत्याचार, वडील आणि भावाची हत्या आईचा अर्धवट जळालेला मृतदेह अन्...

Crime News : वडिल आणि भावाची हत्या, आईचा अर्धवट जळालेला मृतदेह अन् 17 वर्षीय मुलीवर 3 वर्ष अत्याचार; दोघांना फाशीची शिक्षा

Mumbai Tak

मुंबई तक

11 Oct 2025 (अपडेटेड: 11 Oct 2025, 11:42 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

वडिल आणि भावाची हत्या, आईचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला

point

17 वर्षीय मुलीवर 3 वर्ष अत्याचार; दोघांना फाशीची शिक्षा

Crime News : बिहारच्या पूर्वी चंपारण जिल्ह्यातील ढाका येथे घडलेल्या सामुहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणामध्ये मोठी अपडेट समोर आली आहे. 17 वर्षीय मुलीचं अपहरण करून तिला तीन वर्षे कैदेत ठेवत सामूहिक बलात्कार करणाऱ्या दोन आरोपींना न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. ही घटना 2008 ते 2015 दरम्यानची असून, आरोपींनी मुलीच्या वडिलांची व भावाची निर्दयपणे हत्या केली होती, तर आईचा अधजळालेला मृतदेह सापडला होता. या प्रकरणातील मुख्य आरोपी मोहम्मद शमीम अख्तर अद्याप फरार आहे.

हे वाचलं का?

नेमकी घटना काय?

ही भयावह क्राईम स्टोरी 2008 मध्ये सीतामढी जिल्ह्यातील महुआवा टोला या छोट्या गावातून सुरू झाली. मुलीचे वडील राजीव कुमार सिंह हे शाळेतील शिक्षक होते. गावात ‘पत्रकार’ म्हणून आलेल्या मोहम्मद शमीम अख्तरशी त्यांची ओळख झाली. तो वारंवार त्यांच्या घरी जाऊ लागला, घरच्यांचा विश्वास संपादन केला आणि घरातील स्त्री-पुरुषांमध्ये मतभेद निर्माण केले. एका रात्री त्याने राजीव यांना नातेवाईक आजारी असल्याचे सांगून बाहेर बोलावले आणि आपल्या साथीदारांच्या मदतीने त्यांचा गळा दाबून हत्या केली. लवकरच राजीव यांचा 11 वर्षीय मुलगा अमनदीपही रहस्यमयरीत्या मृत अवस्थेत सापडला.

हेही वाचा : 40 लोकांना अश्लील मॅसेज पाठवण्यात आल्याचा दावा, अमरावतीतील माजी न्यायाधीशाकडून 31 लाख रुपये लुबाडले अन्...

पती आणि मुलाच्या मृत्यूनंतर पत्नी आणि 17 वर्षीय मुलगी मानसिक धक्क्यात होत्या. शमीम त्यावेळी ‘मदतीचा हात’ म्हणून त्यांच्या आयुष्यात आला. 2009 मध्ये त्याने दोघींनाही पूर्वी चंपारणच्या ढाका येथील गांधी नगर भागात एका भाड्याच्या घरात नेले. काही काळाने रीना गायब झाली. महिनाभरानंतर जवळच्या शेतात एक अधजळालेला स्त्री मृतदेह सापडला, जो रीना हिचाच असल्याची शक्यता व्यक्त झाली, मात्र पोलीस त्याची अधिकृत ओळख पटवू शकले नाहीत.

यानंतर 17 वर्षीय मुलगी एकटी राहिली. शमीमने तिचं जगाशी नातं तोडलं. तिचा मोबाइल हिसकावून घेतला आणि तिला एका बंद घरात कैद केलं. दरवाज्याला बाहेरून दोन कुलुपं लावली जात. रोज वेगवेगळे लोक येऊन तिच्यावर अत्याचार करत. नशेची औषधं, इंजेक्शन देऊन तिला बेशुद्ध केलं जात असे. या अमानुष कृत्यात शमीम अख्तरसोबत राजू मियां, इसरार मियां, माजिद, अमित आणि चंदन या सहा जणांचा सहभाग होता. 24 फेब्रुवारी 2015 रोजी वाहन चोरीच्या तपासात पोलीस जेव्हा त्या घरात छापा मारण्यासाठी गेले, तेव्हा त्यांना बंद दरवाज्याच्या मागे सडलेल्या वासाने धक्का बसला. कुलुपं तोडून आत गेल्यावर फाटकी कपडे घातलेली, अशक्त आणि अर्धवट शुद्धीत असलेली 17 वर्षी मुलगी सापडली. घरभर मलमूत्राचे डाग, दुर्गंधी आणि अत्याचारांचे स्पष्ट पुरावे होते. पोलिसांनी तिला रुग्णालयात दाखल केलं.

मेडिकल तपासणीत तिच्यावर झालेल्या अत्याचारांची पुष्टी झाली. नंतर तिने दिलेल्या जबाबावरून पोलिसांनी POCSO कायद्यान्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. काही दिवसांत राजू मियां आणि चंदन यांना अटक करण्यात आली. 2017 मध्ये प्रकरण न्यायालयात गेले. 17 वर्षीय मुलीचा जबाब आणि वैद्यकीय पुरावे पाहून न्यायालयाने 2022 मध्ये राजू मियां आणि इसरार मियां यांना फाशीची शिक्षा व प्रत्येकी 75 हजार रुपये दंड ठोठावला. इतर तीन आरोपी पुराव्याअभावी निर्दोष ठरले. निकालानंतर सिमरनने न्यायालयाबाहेर सांगितले, “मला पूर्ण न्याय मिळाला नाही. माझ्या आयुष्याचा नाश करणाऱ्या शमीम अख्तरलाही फाशी व्हायला हवी.”

इतर महत्त्वाच्या बातम्या 

विवाहितेचे एकाच वेळी दोन तरुणांसोबत प्रेमसंबंध! संतापलेल्या प्रियकराने दिली मोठी शिक्षा, मुलीला सुद्धा सोडलं नाही...

 

 

    follow whatsapp