Amravati Crime: अमरावती जिल्ह्यातून सायबर गुन्हेगारीचं एक प्रकरण समोर आलं आहे. येथील ग्राहक न्यायलयातील एका सेवानिवृत्त न्यायाधीशाला सायबर भामट्यांनी तब्बल 31 लाख रुपयांना गंडा घातल्याचं वृत्त समोर आलं आहे. शुक्रवारी (10 ऑक्टोबर) पोलिसांनी या प्रकरणाबाबत माहिती दिली. अमरावतीच्या सायबर पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 71 वर्षीय माजी न्यायाधीशाने आपली सायबर फसवणूक झाली असल्याची एक तक्रार दाखल केली आणि तक्रारीच्या आधारे पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला.
ADVERTISEMENT
40 लोकांना अश्लील मॅसेजेस पाठवण्यात आल्याचा दावा
पोलिसांना मिळालेल्या तक्रारीच्या आधारे, 25 सप्टेंबर रोजी पीडित व्यक्तीला एका अज्ञात नंबरवरुन फोन आला. त्यावेळी फोन करणाऱ्या व्यक्तीने संबंधित माजी न्यायाधीशाच्या नावावर नोंदणीकृत असलेल्या मोबाईल सिमकार्डच्या माध्यमातून 40 लोकांना अश्लील मॅसेजेस पाठवण्यात आल्याचा दावा केला. हा दावा करत त्या व्यक्तीने पीडितला तुरुंगात पाठवण्याची धमकी सुद्धा दिली. पोलीस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, फोन करणाऱ्याने पीडित व्यक्तीचं नाव पैशांच्या घोटाळ्याप्रकरणी समोर आलं असून त्याच्या बँक खात्याचा वापर मोठ्या फसणूकीसाठी करण्यात आल्याचं सांगून धमकी दिली.
हे ही वाचा: विवाहितेचे एकाच वेळी दोन तरुणांसोबत प्रेमसंबंध! संतापलेल्या प्रियकराने दिली मोठी शिक्षा, मुलीला सुद्धा सोडलं नाही...
31 लाख रुपये जमा करण्यास भाग पाडलं
अधिकाऱ्यांनी या प्रकरणाबाबत माहिती देताना सांगितलं की फसवणूक करणाऱ्या आरोपी तरुणाने पीडित वृद्धाला याबद्दल कोणालाही काहीच न सांगण्याचं सुचवलं आणि असं केल्यास थेट तुरुंगात पाठवण्याची धमकी दिली. तसेच, फोन करणाऱ्या आरोपीने माजी न्यायाधीशाला दोन वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये 31 लाख रुपये जमा करण्यास भाग पाडलं आणि तपासादरम्यान, त्याच्याविरुद्ध काही आक्षेपार्ह माहिती न सापडल्यास ते पैसे परत करण्यात येणार असल्याचं आश्वासन दिलं.
हे ही वाचा: पत्नी-पत्नीमधील वाद टोकाला पोहोचला! पत्नीची निर्घृण हत्या अन् पुरावे मिटवण्यासाठी घरात लावली आग...
पोलिसांचा तपास
घटनेच्या दोन दिवसांनंतर, पीडित वृद्धाला आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आलं. जाणीव होताच माजी न्यायाधीशाने तातडीने पोलिसात धाव घेतली आणि आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. पोलीस अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, अमरावती सायबर पोलीस आता या प्रकरणाचा तपास करत असून आरोपी तरुणाचा शोध घेत आहेत.
ADVERTISEMENT
