गावी सोडतो असं सांगत तिघांनी 50 वर्षीय विधवा महिलेला नेलं निर्जनस्थळी, आळीपाळीने नको तेच... नंतर पोटात होऊ लागल्या वेदना

Sexually Assault : माणुसकीला काळिमा फासणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मागील आठवड्यात तीन नराधमांनी 50 वर्षीय महिलेचे दोन वेळा लैंगिक शोषण केलं आहे, नेमकं प्रकरण काय जाणून घ्या.

sexually assault

sexually assault

मुंबई तक

• 08:33 AM • 11 Oct 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

पीडित महिला होती विधवा

point

गावात सोडतो सांगून तिघांनी केलं लैंगिक शोषण

Sexually Assault : गुजरातच्या गिर सोमनाथ जिल्ह्यात माणुसकीला काळिमा फासणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मागील आठवड्यात तीन नराधमांनी 50 वर्षीय महिलेचे दोन वेळा लैंगिक शोषण केलं आहे. या प्रकरणात पोलिसांनी तिन्ही संशयित मच्छिमारांना अटक करण्यात आली आहे. या घटनेनं परिसर हादरून गेला आहे. या घटनेनंतर महिलेला रुग्णालयात नेण्यात आले तेव्हा या प्रकरणाचा उलगडा झाला. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : पुणे हादरलं! दोघेही एकत्र दारू प्यायले, नंतर वाद झाला, गर्लफ्रेंडची सटकली आणि बॉयफ्रेंडलाच...

पीडितेच्या पोटात तीव्र वेदना

टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या एका वृत्तानुसार, मंगळवारी उना येथील सरकारी रुग्णालयात एका पीडित महिलेला दाखल करण्यात आले होते. तेव्हा तिची तपासणी केली असता, या घटनेची माहिती समोर आली. तिच्या पोटात तीव्र वेदना होऊ लागल्या होत्या. तिच्यावर करण्यात आलेल्या बलात्काराबाबत तिने डॉक्टरांना माहिती दिली. तेव्हा त्यांनी कायदेशी तक्रार करत पोलिसांना कळवले आणि कारवाई सुरु केली. 

पोलिसांनी केलेल्या कारवाईत, बलात्कार पीडितेन नवबंदर मरीन पोलीस ठाण्यात तिघांविरोधात तक्रार दाखल केली. महिलेच्या पतीचे 10 वर्षांपूर्वीच निधन झालं होतं. पोलिसांनी दिलेल्या तक्रारीत महिलेनं म्हटलं की, एका आठवड्यापूर्वी मांडवी चेकपोस्टवरून तिच्या गावी निघाली होती, तेव्हा तिथे तिघांनी गावात सोडतो असे सांगितले आणि ती जाण्यास तयारही झाली. 

हे ही वाचा : नवरा होता शारीरिकदृष्ट्या कमजोर, दीराकडून शरीरसुखाची मागणी, महिलेनं विरोध करताच हुंडा अन्... भयंकर कांड समोर

आळीपाळीने लैंगिक शोषण

काही अंतरानंतर त्यांनी तिला एका निर्जनस्थळी नेले आणि तिच्यावर आळीपाळीने लैंगिक शोषण केले. त्यानंतर तिघांनी तिला एका आरोपीच्या घरी नेले आणि पुन्हा तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर याबाबत कोणाला काही सांगितल्यास वाईट परिणाम भोगावे लागतील अशी धमकीही दिली. या प्रकरणी आता आरोपींचटा शोध घेण्यासाठी आणि त्यांना पकडण्यासाठी पोलिसांनी अनेक पथके तयार केली आहेत. 

    follow whatsapp