Rape Case: बिहारच्या नवादा येथील राष्ट्रीय जनता दलाचे (आरजेडी) माजी आमदार राजवल्लभ यादव यांच्यावर एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप केला होता. मात्र, पाटणा हायकोर्टाकडून आरोपीला गुरुवारी या प्रकरणातून निर्दोष मुक्त करण्यात आलं. पीडितेवर जबरदस्तीने बलात्कार केल्याचा कोणताही पुरावा नसल्याचं हायकोर्टाने मान्य केलं. पीडितेला लैंगिक संबंध ठेवण्याची सवय म्हणजेच असल्याचं वैद्यकीय तपासणीत डॉक्टरांना आढळून आलं होतं. तिच्यासोबत जबरदस्तीने लैंगिक संबंध ठेवल्याचा कोणताही पुरावा आढळला नाही. पीडितेचे वय 18 वर्षांपेक्षा कमी असल्याचं सिद्ध करण्यात सरकारी वकिलांना अपयश आलं.
ADVERTISEMENT
शिक्षा रद्द करण्यात आली
राजबल्लभ यादव यांना 2018 मध्ये कनिष्ठ न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. सरकारी वकिलांनी पीडितेचे कपडे एफएसएल (फॉरेन्सिक) तपासणीसाठी पाठवले असल्यास त्याचा अहवाल रेकॉर्डवर आणण्यात आला नसल्याचं न्यायालयाने आपल्या निकालात म्हटलं. यामुळेच उच्च न्यायालयाने 21 डिसेंबर 2018 रोजी कनिष्ठ न्यायालयाने दिलेली शिक्षा रद्द करण्यात आली.
हे ही वाचा: काश्मीरमध्ये प्रचंड मोठी जीवितहानी, एका क्षणात 44 जणांचा मृत्यू; 'ती' आपत्ती आणि...
तुरुंगातून तात्काळ सुटका करण्याचे आदेश
पाटणा हायकोर्टाने माजी आमदार राजबल्लभ प्रसाद उर्फ राजबल्लभ यादव यांच्यासोबत सुलेखा देवी, राधा देवी, संदीप सुमन उर्फ पुष्पंजय, तुस्सी देवी आणि छोटी देवी उर्फ अमृता यांना या खटल्यातील सर्व आरोपातून निर्दोष मुक्त केले आणि त्यांची तुरुंगातून तात्काळ सुटका करण्याचे आदेश दिले. गुरुवारी, न्यायमूर्ती मोहित कुमार शाह आणि न्यायमूर्ती हरीश कुमार यांच्या खंडपीठाने एकत्रितपणे 6 फौजदारी अपीलांवर सुनावणी पूर्ण केली आणि 315 पानांचा आदेश जारी केला.
हे ही वाचा: Independence Day : इंग्रजांनी 14-15 ऑगस्टच्या मध्यरात्रीच भारताकडे सत्ता का सोपवली? शेवटच्या 24 तासात काय काय घडलं?
पीडितेने तक्रारीत काय म्हटलं होतं?
हे प्रकरण 2016 सालचं असल्याचं सांगण्यात येत आहे. प्रकरणातील पीडितेने बिहार शरीफच्या महिला पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. पीडित मुलगी नालंदा जिल्ह्यातील राहुई पोलिस स्टेशन परिसरातील रहिवासी असल्याचं सांगण्यात आलं. ती बिहार शरीफमध्ये भाड्याच्या घरात राहून तिचं शिक्षण पूर्ण करत होती. संबंधित पीडितेने तक्रार करताना सांगितलं होतं की तिच्या शेजारी राहणारी सुलेखा देवी तिला एकदा बर्थडे पार्टीच्या बहाण्याने कुठेतरी घेऊन गेल्या होत्या. तिथे तिच्यावर बलात्कार झाला. माजी आमदार राजवल्लभ यादव यांच्यावर तिने बलात्काराचा आरोप केला होता.
ADVERTISEMENT
