समोशाच्या पैशांवरून वाद झाला अन् शेतकऱ्याच्या डोक्यात थेट तलवारीने वार... नेमकं प्रकरण काय?

समोशाच्या पैशावरून हा वाद सुरू झाला. हा काही वेळाने हा वाद मिटला, मात्र तरीही या वादानंतर आरोपींनी शेतकऱ्याची हत्या केली.

शेतकऱ्याच्या डोक्यात थेट तलवारीने वार...

शेतकऱ्याच्या डोक्यात थेट तलवारीने वार...

मुंबई तक

• 03:03 PM • 22 Oct 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

समोशाच्या पैशांवरून मोठा वाद झाला

point

शेतकऱ्याच्या डोक्यात थेट तलवारीने वार...

Crime News: बिहारमधील भोजपूरमध्ये तलवारीच्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. समोशाच्या पैशावरून हा वाद सुरू झाला. हा काही वेळाने हा वाद मिटला, मात्र तरीही या वादानंतर आरोपींनी शेतकऱ्याची हत्या केली. ही घटना चौरी पोलीस स्टेशन हद्दीतील कौलोडिहरी गावात घडल्याची माहिती आहे.

हे वाचलं का?

सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल  

घरातील मृत शेतकऱ्याचं नाव चंद्रमा यादव असून ते 65 वर्षांचे होते. घटनेनंतर, जखमी अवस्थेत त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. पीडित शेतकऱ्याच्या शरीरावर आणि डोक्यावर खूप जखमा आढळून आल्या. मंगळवारी आरा येथील रुग्णालयात मृतदेहाचं पोस्टमॉर्टम करण्यात आलं. संबंधित प्रकरणासंदर्भात सहा जणांविरुद्ध प्राथमिक गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचं सांगण्यात येत आहे.

आरोपींसोबत समोशाच्या पैशांवरून भांडण  

मृत शेतकऱ्याचे दाजी देवमुनी सिंग यादव यांच्या म्हणण्यानुसार, "शनिवारी संध्याकाळी चंद्रमा यादव यांचा नातू त्याच गावातील आशा देवी नावाच्या महिलेच्या दुकानात समोसे खरेदी करण्यासाठी गेला होता. तिथे त्यांचं आरोपींसोबत समोशाच्या पैशांवरून भांडण झालं खरंतर, शनिवारी संध्याकाळी हे प्रकरण मिटवण्यात आलं. परंतु, रविवारी सकाळी चंद्रमा यादव पुन्हा आशा देवीच्या दुकानात गेल्यावर वाद वाढला आणि दोन्ही पक्षांतील लोकांमध्ये हाणामारी सुरू झाली."

हे ही वाचा: तरुणीला गर्भवती केल्याप्रकरणी वडिलांना जन्मठेपेची शिक्षा! मुंबईतील धक्कादायक प्रकरण...

डोक्यावर तलवारीने वार  

या मारहाणीत आरोपीने चंद्रमा यादव यांच्या डोक्यावर तलवारीने वार केल्याचा आरोप आहे, ज्यामुळे ते गंभीररित्या जखमी झाले. त्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना उपचारासाठी आरा सदर रुग्णालयात आणलं. प्राथमिक उपचारानंतर त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पाटणा येथे रेफर करण्यात आलं. मात्र, सोमवारी रात्री उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

उपचारादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू  

त्यानंतर कुटुंबियांनी पीडित वृद्धाचा मृतदेह गावात परत आणला आणि स्थानिक पोलिसांना प्रकरणाची माहिती देण्यात आली. घटनेबद्दल माहिती मिळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी पोहोचले. मृताचे दाजी देवमुनी सिंग यादव यांनी आशा देवी आणि तिच्या मुलांवर शेतकऱ्याची हत्या केल्याचा आरोप केला आहे.

हे ही वाचा: भाच्याच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या महिलेनं घर-दार सोडलं! पण, शेवटी त्यानेच धोका दिला अन् पीडितेनं पोलीस स्टेशनमध्येच...

चौरी पोलीस स्टेशनचे अधिकारी या घटनेबद्दल माहिती देताना म्हणाले की, 18 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी दोन्ही पक्षात तुंबड हाणामारी झाली. या मारहाणीत झालेल्या दुखापतींमुळे पीडित शेतकऱ्याचा मृत्यू झाला. सध्या, या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.

    follow whatsapp