कामावर पोहोचण्यास उशीर…, ट्रॅफिक पोलिसाची होमगार्डलाच कानशिलात

मुंबई तक

• 03:00 PM • 24 Mar 2023

साताऱ्यात एका ट्रॅफिक पोलिसाने होमगार्डलाच कानशिलात लगावल्याची धक्कादायक घटना घडलीय. या घटनेनं गृहरक्षक दलात प्रचंड नाराजी आहे. तसेच संबंधित पोलीस कर्मचाऱ्याच्या विरोधात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे तक्रार अर्ज दाखल केला होता. मात्र या प्रकरणात कोणतीच कारवाई केली जात नाहीय. त्यामुळे संताप व्यक्त होतोय.

ट्रॅफिक पोलिसाची होमगार्डलाच कानशिलात

ट्रॅफिक पोलिसाची होमगार्डलाच कानशिलात

follow google news

Traffic police slap home guard : साताऱ्यात एका ट्रॅफिक पोलिसाने (traffic police) होमगार्डलाच (home guard) कानशिलात लगावल्याची धक्कादायक घटना घडलीय. कामावर पोहोचण्यास उशीर झाल्या कारणाने ट्रॅफिक पोलिसाने ही मारहाण केल्याची माहिती आहे. प्रशांत पतंग देशमुख असं मारहाण झालेल्या होमगार्डचे नाव आहे. तर पोलीस हवालदार राजपूत यांनी ही मारहाण केली होती, असा आरोप आहे. या घटनेनं गृहरक्षक दलात प्रचंड नाराजी आहे. तसेच संबंधित पोलीस कर्मचाऱ्याच्या विरोधात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे तक्रार अर्ज दाखल केला होता. मात्र या प्रकरणात कोणतीच कारवाई केली जात नाहीय. त्यामुळे संताप व्यक्त होतोय. (traffic police slap home guard satara police fight video viral satara sp sameer shaikh what action taken)

हे वाचलं का?

तुझ्या बापाचा नोकर आहे का? असा सवाल करत पोलीस हवालदार (traffic police) राजपूत यांनी होमगार्ड प्रशांत देशमुख यांना कानशिलात लगावल्याची घटना घडली होती. या घटनेचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या प्रकरणात होमगार्डने (home guard)तक्रार दाखल करून सुद्धा कारवाई होत नसल्याने गृहरक्षक दलात प्रचंड नाराजी आहे.

होमगार्डची तक्रार

होमगार्ड (home guard) प्रशांत देशमुख यांनी या प्रकरणात पोलीस हवालदार राजपूत यांच्याविरोधात तक्रार अर्ज केला आहे.या तक्रारीत त्यांनी राजपूत यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. २१ मार्च रोजी सकाळी तासवाडे टोलनाक्यावर नेमणूक होती. नेमणूकीच्या ठिकाणी पोहोचण्यास वाहन उपलब्ध नसल्यामुळे कर्तव्यावर पोहोचण्यास उशीर झाला. त्यामुळे वेळेत न पोहचल्यामुळे ट्रॅफिक हवालदार राजपूत यांनी अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करुन दमदाटी करत कानशिलात लगावली,असा आरोप प्रशांत देशमुख यांनी तक्रार अर्जात केला आहे.

दरम्यान या संपुर्ण घटनेचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. या व्हिडिओत “तुझ्या बापाचा नोकर आहे का?” असं पोलीस हवालदार म्हणताना दिसत आहे. त्यानंतर होमगार्ड (home guard) सुद्धा त्यांना उलट उत्तरे देताना दिसत आहे. दोघांमध्ये जोरदार हमरीतुमरी झालेली पाहायला मिळत आहे. त्यानंतर ट्रॅफिक पोलिस होमगार्डला कानशिलात लगावतो. या घटनेनं गृहरक्षक दलात प्रचंड नाराजी व्यक्त होत असून संबंधित पोलीस कर्मचाऱ्याविरोधात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे तक्रार अर्ज करुनही कोणतीच कारवाई केली जात नसल्यामुळे संताप व्यक्त होतोय.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राजपूत यांच्या कृतीवर सामान्य नागरीक नाराजी व्यक्त करतायत.त्यामुळे आता सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख याबाबत काय कारवाई करणार याकडे गृहरक्षक दलातील कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे.

    follow whatsapp