दोघींना स्विमिंग पूलजवळ नेलं अन् सामूहिक अत्याचार... निष्पाप मुलींसोबत घडलं भयानक...

दिल्लीतील नरेला परिसरात दोन निष्पाप मुलींवर सामूहिक बलात्कार झाल्याचं संतापजनक वृत्त समोर आलं आहे. नरेलामधील एका खाजगी मालमत्तेवर बांधण्यात आलेल्या स्विमिंग पूलजवळ दोन 9 वर्षीय मुलींवर दोन व्यक्तींना सामूहिक बलात्कार केला.

दोघींना स्विमिंग पूलजवळ नेलं अन् सामूहिक अत्याचार...

दोघींना स्विमिंग पूलजवळ नेलं अन् सामूहिक अत्याचार...

मुंबई तक

• 10:49 AM • 13 Aug 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

दोन निष्पाप मुलींवर सामूहिक अत्याचार

point

स्विमिंग पूलजवळ नेलं अन् दोघांनी केला बलात्कार..

Gang rape case: राजधानी दिल्लीतून माणुसकीला काळीमा फासणारी एक बातमी समोर आली आहे. दिल्लीतील नरेला परिसरात दोन निष्पाप मुलींवर सामूहिक बलात्कार झाल्याचं संतापजनक वृत्त समोर आलं आहे. नरेलामधील एका खाजगी मालमत्तेवर बांधण्यात आलेल्या स्विमिंग पूलजवळ दोन 9 वर्षीय मुलींवर दोन व्यक्तींना सामूहिक बलात्कार केला. दोन आरोपींपैकी एक कंत्राटदार, तर दुसरा स्विमिंग पूलचा केअरटेकर असल्याची माहिती आहे. 

हे वाचलं का?

निष्पाप मुलींवर सामूहिक बलात्कार 

दिल्ली पोलिसांच्या माहितीनुसार, प्रकरणातील आरोपी हे दोन्ही पीडित मुलींच्या शेजारी राहत असल्याचं समोर आलं आहे. एके दिवशी दोन्ही मुलींना एका बहाण्याने स्विमिंग पूलजवळील परिसरात नेण्यात आलं. आरोपीची ओळख 37 वर्षीय अनिल कुमार आणि 24 वर्षीय मुनील कुमार असल्याचं सांगण्यात येत आहे. अनिल उत्तर प्रदेश तर मुनील बिहारचा रहिवासी असल्याची माहिती समोर आली. दोन्ही आरोपींनी अल्पववयीन आणि निष्पाप मुलींवर बलात्कार केला आणि त्यानंतर दोघींनाही याबद्दल कोणालाही न सांगण्याची धमकी दिली.

हे ही वाचा:  नात्याला काळिमा! लेकाचा स्पर्म काऊंट कमी असल्याने पाळणा हालेना, आधी सासऱ्याने सूनेवर नंतर नणंदेच्या नवऱ्याने आळीपाळीने...

आईने केली तक्रार दाखल 

प्रकरणातील एका पीडितेने आपल्या आईला घडलेल्या घृणास्पद घटनेबद्दल सांगितलं असता हे धक्कादायक प्रकरण उघडकीस आलं. 8 ऑगस्ट रोजी संबंधित पीडितेच्या आईने पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. पोलिसांकडे तक्रार करताना संबंधित महिलेने तिची मुलगी आणि तिच्यासोबत असलेल्या एका दुसऱ्या मुलीवर नरेलमधील एका स्विमिंग पूल परिसरात बलात्कार करण्यात आल्याचा आरोप केला. याप्रकरणी नरेला पोलिस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या कलम 70(2) (सामूहिक बलात्कार), 127 (चुकीच्या पद्धतीने कोंडून ठेवणे) तसेच 351 (गुन्हेगारी धमकी) आणि लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (POCSO) कायद्याच्या कलम 6 आणि 10 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. 

हे ही वाचा: जन्माष्टमीपूर्वी शनिदेवाचा त्रिएकदश योग, काही राशीतील लोकांचा खिसा कधीही राहणार नाही रिकामा, जाणून घ्या राशिभविष्य

पोलिसांनी दिली माहिती

यानंतर, पीडित मुलींचे जबाब नोंदवण्यात आले आणि तक्रारीची पुष्टी करण्यात आली. पोलिसांनी मुलींच्या जबाबाच्या आधारे आरोपी अनिल आणि मुनीलला अटक केल्याचं सांगितलं जात आहे. पोलिसांना आरोपी मागील कोणत्याही गुन्हेगारी गुन्ह्यांमध्ये सहभागी असल्याचे कोणतेही पुरावे सापडले नाहीत. एका पोलीस अधिकाऱ्याने प्रकरणाची माहिती देताना सांगितलं की, स्विमिंग पूल परिसरातील गेट उघडलेला आढळल्यानंतर मुलींचा एक ग्रुप संबंधित परिसरात घुसला होता. दोन्ही आरोपींनी मुलींना पाहिले आणि चलाखीने त्यापैकी दोन मुलींना पूल पासून दूर नेले आणि त्यांच्यावर सामूहिक बलात्कार केला.

    follow whatsapp