Crime News: उत्तर प्रदेशातील अमरोहा जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथे एका तरुणीने तिच्या मामाच्या मुलाच्या लग्नात गोंधळ घातला आणि नवरदेवालाच लग्न करण्यापासून थांबवलं. त्यानंतर, त्या तरुणीने जे काही सांगितलं, त्यामुळे सर्व कुटुंबियांना मोठा धक्का बसला. इतकेच नव्हे तर, ज्याचं लग्न होणार होतं त्यालाच पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आलं.
ADVERTISEMENT
भर लग्नात नवरदेवावरच गंभीर आरोप
संबंधित तरुणीने नवरदेवावरच फसवणूक केल्याचे गंभीर आरोप केले. ती म्हणाली, तो गेल्या आठ वर्षांपासून तिच्याशी प्रेमसंबंधात होता आणि लग्नाचं खोटं आश्वासन देऊन तिच्याशी शारीरिक संबंध ठेवत होता. या दाव्यामुळे लग्नासाठी उपस्थित असलेल्या नातेवाईकांमध्ये एकच खळबळ उडाली. तरुणीच्या या बोलण्याने वधूचे कुटुंबीय खूप संतापले. पोलीस सुद्धा घटनास्थळी पोहोचले आणि ते वराला त्यांच्यासोबत घेऊन गेले. पीडित तरुणीचा असा दावा आहे की आरोपी हा तिच्या मामाचा मुलगा आहे.
आठ वर्षांपासून शारीरिक संबंध
संबंधित घटना ही सैद नगली पोलीस स्टेशन हद्दीतील ढक्का गावात घडल्याची माहिती आहे. येथे हापुड जिल्ह्यातील मूंदाफरा गावातून एक तरुण लग्नाची वरात घेऊन पोहोचला. मात्र, लग्नाच्या वेळीच एक तरुणी तिथे आली. त्या तरुणीने सगळ्यांसमोर सांगितलं की, वर तिच्या मामाचा मुलगा आहे आणि त्याने लग्नाच्या बहाण्याने तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले होते. लग्नाच्या ठिकाणी तरुणीने रडत रडत सांगितलं की, हा मुलगा गेल्या आठ वर्षांपासून तिच्यासोबत प्रेमसंबंधात होता आणि लग्नाचं आश्वासन देऊन तो तिच्यासोबत असं कृत्य करत होता.
हे ही वाचा: 'त्या' कारणावरून पतीने केली पत्नीची निर्घृण हत्या! नंतर, रक्ताने फरशीवर लिहिली सुसाइड नोट... 'असा' झाला घटनेचा उलगडा
ती तरुणी लग्नाच्या मंडपात नवरदेवाला ओरडून म्हणाली, "माझ्या इज्जतीचं काय? तू मला दिलेल्या वचनांचं काय? तू मला सोडून दुसऱ्या मुलीशी कसं काय लग्न करू शकतोस?" तरुणीचं हे बोलणं ऐकून वधूचे कुटुंबीय अतिशय संतापले आणि मुलाकडचे नातेवाईक सुद्धा तरुणीवर खूप रागावले.
हे ही वाचा: विधीज्ञ असीम सरोदेंना मोठा दिलासा, सनद रद्द करण्याच्या निर्णयाला बार कौन्सिल ऑफ इंडियाची स्थगिती
पोलिसात दाखळ केली तक्रार
नातेवाईकांनी आणि लग्नात आलेल्या पाहुण्यांनी त्या तरुणीला शांत करण्याचा प्रयत्न केला. पण, तरुणीने कोणाचं काहीच ऐकलं नाही आणि नंतर तिने पोलिसांना बोलावलं. त्यानंतर पोलिसांनी वराला लग्नस्थळावरून पोलीस स्टेशनमध्ये नेलं. पोलिसांनी आता कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. तरुणीचे यापूर्वी सुद्धा तिच्या मामाच्या मुलाविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल केली होती. ती म्हणाली की, त्याने मला धोका दिला आहे आणि त्याला माझ्यासोबतच लग्न करावं लागेल."
ADVERTISEMENT











