लॉलीपॉपमुळे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त, 7 वर्षीय भावाचा मृत्यू, 15 वर्षीय बहिणीला अटक

किरकोळ कारणावरून सुरू झालेल्या या भांडणाने एका हसत्याखेळत्या कुटुंबावर कधीही न भरून निघणारी जखम केली आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, एका चिमुरड्याच्या मृत्यूने गावावर शोककळा पसरली आहे.

Crime News

Crime News

मुंबई तक

• 07:33 AM • 21 Apr 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

लॉलीपॉपमुळे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त

point

7 वर्षीय भावाचा मृत्यू

point

15 वर्षीय बहिणीला अटक

Crime News : एका साध्या लॉलीपॉपवरून सुरू झालेला वाद चिमुरड्याच्या मृत्यूपर्यंत पोहोचला आहे. अवघ्या 7 वर्षांच्या आर्यनचा आपल्या 15 वर्षीय मोठ्या बहिणीसोबत झालेल्या झटापटीत दुर्दैवी मृत्यू झाला. किरकोळ कारणावरून सुरू झालेल्या या भांडणाने एका हसत्याखेळत्या कुटुंबावर कधीही न भरून निघणारी जखम केली आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, एका चिमुरड्याच्या मृत्यूने गावावर शोककळा पसरली आहे. ही दुर्दैवी घटना उत्तर प्रदेशातील बस्ती जिल्ह्यातील आहे.

हे वाचलं का?

लॉलीपॉपवरुन बहिण-भावात वाद

मिळालेल्या माहितीनुसार, 11 एप्रिल रोजी सकाळी 11:20 च्या सुमारास आर्यन आणि त्याची मोठी बहीण घरात खेळत होते. एका लॉलीपॉपवरून दोघांमध्ये ओढाताण सुरू झाली आणि पाहता पाहता या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. या झटापटीत आर्यनच्या गळ्याला गंभीर दुखापत झाली आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. या अनपेक्षित प्रकारामुळे घाबरलेल्या बहिणीने स्वतःचा बचाव करण्यासाठी भावाचा मृतदेह खोलीतील छताच्या कुंडीला ओढणीच्या सहाय्याने लटकवला. मात्र, पोस्ट मार्टम अहवालात आर्यनचा मृत्यू लटकवण्यापूर्वीच झाला असल्याचे स्पष्ट झाले, ज्यामुळे या प्रकरणातील सत्य समोर आले.

हे ही वाचा : माहेरी असतानाच नवऱ्याने नर्सची केली हत्या, इंजेक्शन देऊन जीव घेतला, नेमकं कारण काय?

सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

याप्रकरणी पोलिसांनी मृत मुलाच्या वडिलांच्या तक्रारीवरून 15 वर्षीय मुलीविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. एसएचओ विनय पाठक यांनी सांगितले की, प्राथमिक तपास आणि पोस्ट मार्टम अहवालाच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे. हे कृत्य हेतुपुरस्सर नसले तरी एका बालकाचा जीव गेल्याने कायद्यानुसार पावले उचलण्यात आली आहेत. आरोपी मुलगी अल्पवयीन असल्याने हे प्रकरण अत्यंत संवेदनशीलतेने हाताळले जात असून, किशोर न्यायालयाच्या आदेशानुसार तिला बालसुधारगृहात पाठवण्यात आले आहे.

हे ही वाचा : अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांची अडीच लाखांची मागणी; नाराज वडिलांची आत्महत्या

आई-वडिलांची दयनीय अवस्था

या हृदयद्रावक घटनेनंतर आर्यनच्या आई-वडिलांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. एका बाजूला पोटचा मुलगा गमावल्याचे दुःख आणि दुसऱ्या बाजूला मुलगी पोलीस कोठडीत असल्याने या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेवर भाष्य करताना कायदेतज्ज्ञांनी पालकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. मुलांमधील लहान वादही कधी कधी रागाच्या भरात हिंसक वळण घेऊ शकतात, त्यामुळे मुलांमध्ये संयम आणि एकमेकांबद्दल प्रेम निर्माण करणे काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.