अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांची अडीच लाखांची मागणी; नाराज वडिलांची आत्महत्या

मुंबई तक

वडिलांच्या निधनानंतर घरी पोहोचलेल्या पीडित मुलीने आरोप केला आहे की, आरोपीने तिला दिल्लीला नेऊन लग्नासाठी दबाव टाकला आणि त्यानंतर एका हॉटेलमध्ये पाच दिवस ओलीस ठेवून तिच्यावर सोमिलसह त्याच्या मामा आणि मावशीच्या नवऱ्याने बलात्कार केला.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
google news

बातम्या हायलाइट

point

अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

point

आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांची अडीच लाखांची मागणी

point

नाराज वडिलांची आत्महत्या

Crime News : एका 17  वर्षीय मुलीच्या बेपत्ता होण्याने आणि त्यानंतर झालेल्या जाचामुळे व्यथित झालेल्या वडिलांचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. नातेवाईकांनी हा खून असल्याचा आरोप केला असला तरी, पोस्ट मार्टम अहवालात मृत्यूचे कारण 'हँगिंग' म्हणजेच फाशी असल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून पीडित मुलीने आता समोर येत स्थानिक पोलीस आणि आरोपींवर गंभीर आरोप केले आहेत.  उत्तर प्रदेशातील आग्रा परिसरातील ही घटना आहे.

मामा, मावशीचा नवरा आणि तरुणाने केला बलात्कार

मिळालेल्या माहितीनुसार, 31 मार्च रोजी ही तरुणी अचानक बेपत्ता झाली होती, ज्याप्रकरणी तिच्या भावाने सोमिल नावाच्या तरुणाविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. 8 एप्रिल रोजी पोलिसांनी मुलीला ताब्यात घेऊन आशा ज्योती केंद्रात पाठवले होते. वडिलांच्या निधनानंतर घरी पोहोचलेल्या पीडित मुलीने आरोप केला आहे की, आरोपीने तिला दिल्लीला नेऊन लग्नासाठी दबाव टाकला आणि त्यानंतर एका हॉटेलमध्ये पाच दिवस ओलीस ठेवून तिच्यावर सोमिलसह त्याच्या मामा आणि मावशीच्या नवऱ्याने बलात्कार केला.

हे ही वाचा : थारचा अपघात झाला नव्हता, मेहुणा आणि मेहुणीच्या अफेअरमुळे झालं खुनी कांड, कसा झाला खुलासा?

पोलिसांनी मागितली अडीच लाखांची लाच

या प्रकरणात पोलिसांच्या भूमिकेवरही गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. पीडितेच्या कुटुंबीयांनी आरोप केला आहे की, या प्रकरणाचा तपास करणारे उपनिरीक्षक आणि एका महिला पोलीस शिपायाने आरोपींवर कारवाई करण्यासाठी अडीच लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तसेच, आरोपी सोमिल आणि त्याच्या नातेवाईकांनी पोलिसांना जबाब दिल्यास वडिलांना ठार मारण्याची धमकी दिली होती. याच भीतीतून वडिलांनी टोकाचे पाऊल उचलले किंवा त्यांची हत्या करण्यात आली, असा दावा पीडितेने केला आहे.

हे ही वाचा : पंतप्रधान मोदी आज रात्री देशवासियांशी बोलणार, राजकीय वर्तुळात चर्चांना तुफान उधाण.. मोदींच्या मनात नेमकं काय?

पोलिसांनी फेटाळले आरोप

दुसरीकडे, पोलीस प्रशासनाने हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. एसीपी शेषमणी उपाध्याय यांनी सांगितले की, पोस्ट मार्टम अहवालावरून ही आत्महत्या असल्याचे स्पष्ट होत आहे आणि मुलीने यापूर्वी दिलेल्या जबाबात स्वतःच्या इच्छेने गेल्याचे म्हटले होते. वयाबाबतही वाद निर्माण झाला असून, कुटुंबीयांनी तिला अल्पवयीन (17 वर्षे) असल्याचे सांगितले होते, मात्र वैद्यकीय चाचणीत तिचे वय 19 वर्षे असल्याचे समोर आले आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा सर्व बाजूंनी अधिक तपास करत आहेत.
 

हे वाचलं का?