उपचारासाठी गेलेल्या मुलीसोबत घडलं नको ते, पोलिसांनी थेट रुग्णालयच केलं सील

हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्यासाठी आलेल्या 12 वीच्या एका विद्यार्थिनीवर डॉक्टरनेच बलात्कार केल्याचे उघडकीस आले आहे. या घटनेनंतर पीडित मुलीची प्रकृती खालावली असून, तिला वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.

Crime News

Crime News

मुंबई तक

• 07:11 AM • 25 May 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

उपचारासाठी गेलेल्या मुलीसोबत घडलं नको ते

point

पोलिसांनी थेट रुग्णालयच केलं सील

Crime News : उत्तर प्रदेशातील लखनऊमध्ये एका रुग्णालयात अत्यंत संतापजनक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील बीकेटी परिसरातील तेजस हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्यासाठी आलेल्या 12 वीच्या एका विद्यार्थिनीवर डॉक्टरनेच बलात्कार केल्याचे उघडकीस आले आहे. या घटनेनंतर पीडित मुलीची प्रकृती खालावली असून, तिला वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. या घृणास्पद कृत्यामुळे पीडितेच्या कुटुंबीयांसह संपूर्ण परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

हे वाचलं का?

आजारपणावर उपचार करायला गेली अन्..

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित विद्यार्थिनी आजारपणावर उपचार घेण्यासाठी या रुग्णालयात गेली होती. तेथे कार्यरत असलेल्या डॉक्टरने तिच्या विश्वासाचा गैरफायदा घेत हे कृत्य केले. घटनेची माहिती मिळताच पीडितेच्या कुटुंबीयांनी संताप व्यक्त करत आरोपी डॉक्टरवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. 21 मे रोजी पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी तातडीने पावले उचलली आणि गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.

हे ही वाचा : सौंदर्याची खाण, पण बॉयफ्रेंडच्या प्रेमात वेडी, अंघोळीसाठी बाथरूममध्ये गेली अन्...

डॉक्टर पोलिसांच्या ताब्यात

या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलिसांनी तात्काळ कारवाई केली आहे. एसीपी आकाश पांडे आणि त्यांच्या पथकाने आरोपी डॉक्टरला ताब्यात घेतले असून त्याची कसून चौकशी केली जात आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित कलमांखाली गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. सध्या रुग्णालयाच्या परिसरात शांतता असून पोलीस परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.

हे ही वाचा : 'आता आत्म्याचे सावट दूर झाले,' भावाला बाहेर काढले अन् बंद खोलीत वहिणीसोबत..

हॉस्पिटल सील करण्याचे आदेश

दरम्यान, या घटनेचे गांभीर्य ओळखून प्रशासकीय पातळीवरही मोठे पाऊल उचलण्यात आले आहे. उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक यांनी या प्रकरणाची तीव्र दखल घेतली आहे. त्यांनी या घटनेला अत्यंत गंभीर मानत तेजस हॉस्पिटल तात्काळ 'सील' करण्याचे आदेश आरोग्य विभागाला दिले आहेत. मंत्र्यांच्या आदेशानंतर आरोग्य विभाग आणि स्थानिक प्रशासनाने पुढील कारवाईला वेग दिला आहे.