Crime News : तुम्हाला इन्स्टाग्रामवर मुलीच्या नावाने फ्रेंड रिक्वेस्ट आलीये का? आली असेल तर ती स्वीकारण्याआधी ही घटना जाणून घ्या. हनीट्रॅपच्या माध्यमातून लोकांना आपल्या जाळ्यात ओढून खंडणी उकळणाऱ्या आणि फसवणूक करणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी राहुल पाल आणि आकाश या दोन आरोपींना अटक केली आहे. हे आरोपी कधी पोलीस कर्मचारी, तर कधी उच्च अधिकारी बनून लोकांना कारवाईची भीती दाखवत असत. ब्रह्मपुरी पोलीस ठाण्यात नीरज पाल नावाच्या व्यक्तीने दाखल केलेल्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली.
ADVERTISEMENT
शशांक शर्मा, राहुल, आकाश आणि त्यांच्या इतर साथीदारांनी पोलीस अधिकारी असल्याचे भासवून नीरजला धमकावले, दोन लाखांची खंडणी मागितली आणि त्याच्या खात्यातून 10 हजार रुपये ट्रान्सफर करून घेतले. या गंभीर प्रकरणानंतर वरिष्ठ पोलीस अधीक्षकांच्या सूचनेनुसार पथक तयार करून पोलिसांनी राहुल आणि आकाशला रंगेहात अटक केली. उत्तर प्रदेशातील मेरठमधील ही घटना आहे.
'असा' साधायचे डाव
पोलीस तपासात आणि चौकशीदरम्यान आरोपींनी स्पष्ट केले की, त्यांची पाच जणांची टोळी Instagram च्या माध्यमातून लोकांना जाळ्यात ओढायची. सोशल मीडियावर मुलींचे बनावट अकाऊंट तयार करून तरुणांशी संवाद साधला जायचा आणि त्यांना संवादात गुंतवून एका ऑफिसमध्ये भेटायला बोलावले जायचे. पीडित तरुण तिथे पोहोचताच त्याला धमकावण्याचा खेळ सुरू व्हायचा. आरोपी स्वतःला पोलीस अधिकारी सांगून, बनावट FIR दाखवून आणि कायदेशीर कारवाईची भीती घालून तरुणांकडून मोठ्या रकमेची मागणी करायचे. नीरज पाल यालाही याच पद्धतीने जाळ्यात ओढण्यात आले होते.
हे ही वाचा : उद्धव ठाकरे असं बोलले की, संजय राऊत जोरात हसले; नेमकं काय म्हणाले?
बनवाट पोलीस चौकी?
एसपी सिटी विनायक गोपाळ भोसले यांनी दिलेल्या माहितीनुसार, नीरज जेव्हा बोलावलेल्या ठिकाणी पोहोचला, तेव्हा ज्या मुलीशी तो बोलत होता ती तिथे नव्हती. त्यानंतर व्हिडिओच्या नावाखाली त्याला ब्लॅकमेल करून दोन लाखांची खंडणी मागण्यात आली. दरम्यान, ही टोळी येथे एक 'बनावट पोलीस चौकी' चालवत असल्याचा दावा सोशल मीडियावर केला जात होता; मात्र मेरठ पोलिसांनी हा दावा फेटाळून लावला आहे. तिथे कोणतीही बनावट पोलीस चौकी नसून केवळ एक ऑफिस होते, असे पोलिसांनी स्पष्ट केले. हा पूर्णपणे हनीट्रॅपचा प्रकार असून यातील दोन प्रमुख आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.
हे ही वाचा : Maharashtra Weather : राज्यातील 'या' जिल्ह्यांवर अस्मानी संकट, वरुणराजा खवळणार
कधी पत्रकार, कधी पोलीस
कारवाईदरम्यान पोलिसांनी आरोपींच्या ताब्यातून विना नंबर प्लेटची कार, एक अतिरिक्त नंबर प्लेट, दोन मोबाईल, टेलिफोन, लॅपटॉप, टॅब्लेट, कॅल्क्युलेटर आणि वॉकी-टॉकी जप्त केली आहे. याशिवाय फोनपे रिसिव्हर बॉक्स, काठी, बीट बुक, शिक्के, नेम प्लेट, विविध अर्ज, फाइल्स आणि इतर कागदपत्रेही हस्तगत करण्यात आली आहेत. हे आरोपी गरजेनुसार पत्रकार किंवा पोलीस बनून आपली ओळख बदलत असत. सध्या या टोळीतील दोन सदस्य फरार असून, पोलीस संपूर्ण नेटवर्कचा शोध घेत आहेत. Instagram च्या माध्यमातून या टोळीने आतापर्यंत किती लोकांना लक्ष्य केले आणि किती रकमेची वसुली केली, याचा सखोल तपास पोलीस करत आहेत.
ADVERTISEMENT












