Sangli Crime News : स्वाती चिखलीकर - सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातून मन सुन्न करून टाकणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. आरोपीने एका चार वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करत खून केला. पुरावा नष्ट करण्यासाठी लोखंडी पेटीत मृतदेह भरण्यात आला होता. न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवून मरेपर्यंत फिशीची शिक्षा सुनावली आहे. आरोपीची पांडुरंग सोमना कळ्ळी (वय 46) अशी ओळख समोर आली. सांगली जिल्हा व सत्र न्यायालयाच्या बाल अत्याचार प्रतिबंधक विशेष न्यायालयाच्या न्यायाधीशांनी सदरची शिक्षा सुनावली.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : वर्ग सुरू असतानाच मुख्याध्यापकाने काढली पँट, विद्यार्थ्यांसोबत अश्लील चाळे
पीडित चिमुरडीची आई माहेरी
ज्या चिमुरडीवर अत्याचार करून खून करण्यात आली ती तिच्या आजीकडे राहत होती. तिची आई ही काही दिवसांसाठी कर्नाटकातील मुधोळे येथे माहेरी गेली होती. तर वडील बांधकाम मजुरीसाठी रत्नागिरीला गेले होते. मुलीच्या घरापासून काहीच अंतरापासून आरोपी पांडुरंग सोमलिंग कळ्ळी या आरोपीचे घर होते.
मुलगी घराबाहेर खेळताना अचानकपणे बेपत्ता
2 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी मुलगी घराबाहेर खेळताना अचानकपणे बेपत्ता झाली. कुटुंबीयांनी त्वरित तिचा शोध घेण्यास सुरूवात केली. संबंधित प्रकरणाची गावकऱ्यांना माहिती देत शोध सुरू केला. या घटनेची पोलिसांना माहिती देण्यात आली होती. मुलीच्या घरामागे राहणारा पांडुरंग हा शोध मोहिमेत सामील झाला होता. मात्र, त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं.
प्लास्टिकच्या पिशवीत मृतदेह
सुरूवातीला पोलिसांची दिशाभूल करण्याचा त्याने प्रयत्न केला. पोलिसांचा दबाव वाढण्यात आला असता, मृतदेह प्लास्टिकच्या पिशवीत बांधलेल्या स्वरुपात आढळला होता. चिमुरड्या मुलीवर अत्याचार करून खून केल्याच्या घटनेनं संपूर्ण जिल्हा हादरून गेला आहे. या घटनेनं नागरिकांच्या मनात संतापाची लाट उसळली आहे.
हे ही वाचा : 42 वर्षीय घरमालकाकडून 10 वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचार, पीडितेच्या आईची पोलीस ठाण्यात तक्रार
घटनेची गंभीर दखल घेत पोलिसांनी तातडीने तपास करून अवघ्या 15 दिवसांत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सरकारी वकील प्रमोद भोकरे यांनी आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी केली आहे. आरोपी पांडुरंग कळ्ळी याला न्यायालयाने दोषी धरून मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावलीय.
ADVERTISEMENT












