42 वर्षीय घरमालकाकडून 10 वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचार, पीडितेच्या आईची पोलीस ठाण्यात तक्रार

मुंबई तक

crime news : 42 वर्षीय घरमालकाने 10 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे, नेमकं प्रकरण काय हे पुढीलप्रमाणे नमूद करण्यात आलंय.

ADVERTISEMENT

crime news
crime news
Google CTA

बातम्या हायलाइट

point

घरमालकाने 10 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप

point

आरोपी 42 वर्षीय असल्याची माहिती

point

पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल

Crime News : घरमालकाने एका 10 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक आरोप करण्यात आला. संबंधित प्रकरणात पीडितेच्या आईने पोलीस ठाण्याच तक्रार केली होती. संबंधित आरोपी हा 42 वर्षीय असल्याची माहिती समोर येत आहे. ही घटना उत्तर प्रदेशातील गोवर्धन परिसरातील असून तिच्या घटनेनं परिसर हादरून गेला आहे. आरोपी हा पश्चिम बंगाल येथील असल्याचे वृत्त आहे. 

हे ही वाचा : "मला चंद्रकांत पाटलांच्या मेंदूवरील फिंगरप्रिंट्स बघायचेत", राज ठाकरेंनी तंत्रशिक्षण मंत्र्यांची काढली पिसं

काही काळापासून चिमुरडीवर लैंगिक अत्याचाराचा आरोप 

टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, आरोपी काही काळापासून चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करत होता, नंतर कथितरित्या अश्लील फोटो आणि व्हिडिओ त्याने साठवून ठेवले होते. संबंधित प्रकरणात आरोपीने बुधवारी अल्पवयीन मुलीवर पुन्हा हल्ला केल्याचा धक्कादायक आरोप करण्यात आला आहे. तिने या घटनेबाबतची माहिती तिच्या आईला सांगितलं. 

पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल

तक्रारीच्या आधारे अल्पवयीन मुलीवर पुन्हा हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला. पोलीस या प्रकरणाचे एकूण पुढील तपास करत असल्याची माहिती समोर आलीय. मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी भारतीय न्याय संहिता आणि पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

हे ही वाचा : "दुसऱ्यांनाही आई असते, हे तुमच्या पक्षातील लोकांना...", राज ठाकरेंचं पीएम मोदींना प्रत्युत्तर

दरम्यान, मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले असून पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. एका सहायक पोलीस अधीक्षकाने सांगितलं की, एकूण प्रकरण निष्पन्न झाल्याच्या आधारावर पुढील प्रकरणाची कायदेशीर कारवाई केली जात आहे.