Crime News : शिक्षक-विद्यार्थ्यांच्या नात्याला काळिमा फासणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मुख्याध्यापकाने वर्ग सुरू असतानाच सर्व विद्यार्थ्यांसमोर लाज आणणारं कृत्य केलं. सर्व विद्यार्थ्यांसमोर त्याने आपली पँट उतरवली, नंतर अश्लील कृत्य करण्याचा प्रयत्न केला. या घटनेनं विद्यार्थ्यांची घारबगुंडी उडाली. ही घटना छत्तीसगढच्या जांजगीर-चंपा जिल्ह्यातील पामगढ ठाणे क्षेत्रातील आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : "मला चंद्रकांत पाटलांच्या मेंदूवरील फिंगरप्रिंट्स बघायचेत", राज ठाकरेंनी तंत्रशिक्षण मंत्र्यांची काढली पिसं
शिक्षक-विद्यार्थ्यांच्या नात्याला काळिमा
घडलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी जेव्हा चौथी आणि पाचवी इयत्तेतील विद्यार्थी शिक्षण घेत होती. तेव्हा मुख्याध्यापक भुवनेश्वर कौशिक पँट काढून बसला होता. तेव्हा काही विद्यार्थी मुख्याध्यापकांकडे गेले होते, तेव्हा तीन मुलांसमोर मुख्याध्यापकाने लघवी केली. लहान मुलांना जवळ बोलावून त्यांच्यासोबत अश्लील कृत्य केलं. या घटनेची माहिती मिळताच, विद्यार्थी घाबरून गेले आणि शाळा संपताच तात्काळपणे घरी गेले.
मुख्याध्यापक खुर्चीत अर्धनग्न
लहान मुलांच्या तोंडून अशी लज्जास्पद घटना ऐकून कुटुंबीय आणि नागरिकांचा संताप वाढला. घटनास्थळी मुख्याध्यापक भुवनेश्वर कौशिक हे खुर्चीत अर्धनग्न अवस्थेत बसले होते. काही लोकांनी मुख्याध्यापकाचा व्हिडिओ बनवला होता. त्यानंतर तो पँट परिधान करू लागला होता. या घटनेनंतर पामगड पोलीस आणि प्रशासनाने तातडीने कारवाई सुरू केली.
हे ही वाचा : मोदींचं कौतुक करणारे विवेक ओबेरॉय अन् आर माधवन राहायला दुबईत, राज ठाकरेंनी सगळंच काढलं
कुटुंबीयांनी तात्काळ आपत्कालीन सेवेला, 112 क्रमांकावर फोन लावला आणि माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि आरोपी मुख्याध्यापिकाला गर्दीतून सोडवून पोलीस ठाण्यात नेण्यात आले. पामगड पोलीस ठाण्याती पीडित विद्यार्थी आणि कुटुंबीयांनी केलेला जबाब नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीवर एफआयआर दाखल केली.
ADVERTISEMENT












