वहिनीचे शीर तोडून झाडाला लटकवले, दीराचं भयंकर कृत्य, नेमकं कारण काय?

मुंबई तक

• 12:10 PM • 01 Aug 2026

जेवण द्यायला उशीर झाल्यामुळे संतापाच्या भरात दीराने आपल्या वहिनीची हत्या केली. कुऱ्हाडीने शीर तोडून ते झाडाला लटकवले. हे भयंकर दृश्य बघून सगळेच सुन्न झाले. बिहारमधील ही घटना आहे.

Crime News

Crime News

Google CTA

बातम्या हायलाइट

point

वहिनीचे शीर तोडून झाडाला लटकवले

point

दीराचं भयंकर कृत्य

point

नेमकं कारण काय?

Crime News : एक अत्यंत धक्कादायक आणि सुन्न करणारी घटना घडली आहे. जेवणाला उशीर झाल्याच्या क्षुल्लक कारणावरून संतप्त झालेल्या एका नराधमाने आपल्या 25 वर्षीय भावजयीची कुऱ्हाडीने गळा चिरून निघृण हत्या केली. या अमानुष कृत्यानंतर आरोपीने मृताचे कापलेले शीर घरासमोरील झाडाला लटकवले, ज्यामुळे संपूर्ण परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. अंशू देवी (वय 25) असे या दुर्दैवी मृत महिलेचे नाव असून त्या धर्मेंद्र कुमार यांच्या पत्नी होत्या. बिहारच्या जेहानाबाद जिल्ह्यातील ही घटना आहे.

हे वाचलं का?

कुऱ्हाडीने हल्ला केला अन्...

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी कुणाल कुमार हा अमली पदार्थांच्या आहारी गेलेला असून व्यसनी आहे. घटनेच्या वेळी अंशू देवी घरात एकट्याच होत्या, तर कुटुंबातील इतर सदस्य शेतात कामासाठी गेले होते. शेतातून घरी परतलेल्या कुणालने अंशू देवी यांच्याकडे जेवणाची मागणी केली. मात्र, जेवण वाढण्यास काहीसा उशीर झाल्याने तो प्रचंड चिडला. रागाच्या भरात त्याने घरात असलेली कुऱ्हाड उचलली आणि अंशू देवी यांच्यावर प्राणघातक हल्ला करून त्यांची हत्या केली.

हे ही वाचा : नवरा ऑस्ट्रेलियाला गेलाय, बायको 2 वर्ष सांगत राहिली, शेवटी दृश्यम स्टाईल ट्वीस्ट

शीर झाडाला लटकवले

या अत्यंत भयंकर गुन्ह्यानंतर आरोपीने घटनास्थळावरून पळून जाण्याचा कोणताही प्रयत्न केला नाही. तो रक्ताने माखलेल्या अवस्थेत घराच्या बाहेरच शांतपणे बसून राहिला. या निघृण हत्येची माहिती वाऱ्यासारखी पसरताच गावातील ग्रामस्थांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. झाडाला लटकवलेले शीर आणि मृतदेह पाहून ग्रामस्थ सुन्न झाले. त्यांनी तात्काळ या घटनेची माहिती स्थानिक पोलिसांना दिली.

हे ही वाचा : 'सॉरी आई, मी निघून जातीये...' लग्नानंतर सातच महिन्यात शिक्षिकेने संपवलं जीवन, धक्कादायक कारण समोर

कुणाल कुमार ताब्यात

घटनेची माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी हत्येसाठी वापरलेली कुऱ्हाड जप्त केली असून आरोपी कुणाल कुमारला घटनास्थळावरूनच ताब्यात घेऊन अटक केली आहे. सध्या पोलीस या प्रकरणी पुढील कायदेशीर कारवाई करत असून या घटनेमुळे इमादपूर गावात अत्यंत भीतीचे आणि शोकाकुल वातावरण निर्माण झाले आहे.