'सॉरी आई, मी निघून जातीये...' लग्नानंतर सातच महिन्यात शिक्षिकेने संपवलं जीवन, धक्कादायक कारण समोर

मुंबई तक

• 11:29 AM • 01 Aug 2026

डेहराडूनमध्ये आठ महिन्यांपूर्वीच लग्न झालेल्या नवविवाहित शिक्षिका सृष्टी कंधारी यांनी संशयास्पद परिस्थितीत गळफास घेऊन आत्महत्या केली. मृत्यूच्या काही वेळ आधी, सृष्टीने आपले दुःख व्यक्त करणारा एक व्हिडिओ बनवला होता.

Crime News

Crime News

Google CTA

बातम्या हायलाइट

point

'सॉरी आई, मी निघून जातीये...'

point

लग्नानंतर सातच महिन्यात शिक्षिकेने संपवलं जीवन

point

धक्कादायक कारण समोर

Crime News : एका सरकारी शाळेतील शिक्षिकेचा संशयास्पद परिस्थितीत फाशी घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला आहे. सृष्टी कंडारी असं या शिक्षिकेचं नाव असून त्या उत्तराखंडमधील डेहराडून परिसरातील रहिवासी होत्या. 29 जुलै रोजी संध्याकाळी सुमारे साडेसात वाजता सृष्टी यांनी 'सॉरी मम्मी, मी जात आहे' असे म्हणत आपला छळ झाल्याचं  सांगणारा एक भावूक व्हिडिओ तयार केला आणि त्यानंतर कथितपणे आत्महत्या केली. 

हे वाचलं का?

'तू अपशकुनी आहेस...'

लग्नानंतर लगेचच हुंडा, मानसिक छळ आणि अंधश्रद्धेतून त्यांना अपशकुनी ठरवून त्रास दिला जात असल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी मृत महिलेचे पती, सासू आणि नणंद यांच्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम 80 (2) अंतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केला आहे. सृष्टी यांचा विवाह 29 नोव्हेंबर 2025 रोजी सौरभ रतुडी यांच्याशी झाला होता.

हे ही वाचा : 'अमेरिका से भारत आया था चुपके-चुपके, उनका नाम है अभिजीत दिपके'; रामदास आठवलेंची भन्नाट कविता ऐकाच

गणिताची टॉपर

सृष्टी यांची आई सीमा कंडारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, लग्नानंतर सुमारे तीन महिन्यांनी सृष्टी यांच्या सासऱ्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि नंतर त्यांना कर्करोग असल्याचे निदान झाले. सासरच्या मंडळींनी एका तांत्रिकाच्या सांगण्यावरून सून घरात आल्यामुळेच हे सर्व अनिष्ट घडत असल्याचा समज करून घेतला. या घटनेच्या तीन दिवसांपूर्वीच सासऱ्यांचे निधन झाल्याने सृष्टी यांच्यावरील मानसिक दबाव आणखी वाढवण्यात आला होता.  सृष्टी या गणित विषयात टॉपर होत्या. 29 जुलै रोजी सृष्टी यांच्याशी संपर्क न झाल्याने कुटुंबीय श्रीनगरहून डेहराडूनला पोहोचले, तेव्हा त्यांना मुलीच्या मृत्यूची माहिती मिळाली. 

हे ही वाचा : अभिजीत दिपकेंचा जेनझी बद्दलचा विचार काय? मुलाखतीत सगळे खळखळून हसले...

तपास क्राइम ब्रँचकडे

अंधश्रद्धेपोटी केलेल्या छळामुळेच हा प्रकार घडला असून सृष्टी आत्महत्या करू शकत नाही, असा ठाम दावा कुटुंबीयांनी केला आहे. या गंभीर घटनेची दखल घेत देवप्रयागचे आमदार विनोद कंडारी यांनी मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांची भेट घेऊन प्रकरणाच्या निष्पक्ष तपासाची मागणी केली होती. प्रकरणाची संवेदनशीलता लक्षात घेऊन मुख्यमंत्र्यांनी गृहसचिवांना या प्रकरणाचा तपास क्राइम ब्रँचकडे कडे सोपवण्याचे लेखी निर्देश दिले आहेत.  सध्या पोलीस शवविच्छेदन अहवाल आणि फॉरेन्सिक पुराव्यांच्या आधारे पुढील कायदेशीर कारवाई करत आहेत. हे प्रकरण सध्या संपूर्ण उत्तराखंडमध्ये अत्यंत चर्चेचा आणि चिंतेचा विषय ठरले असून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.