नवरा महाराष्ट्रातून घरी पोहोचला, बायकोचा मृतदेह बघून फोडला हंबरडा; पोलिस तपासात भयंकर माहिती उघड

Crime News : एका नराधम भावाने आपल्या मोठ्या बहिणीची गळा आवळून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. उमाकांती (26) असे मृत महिलेचे नाव असून, लग्नाला अवघे तीन महिने पूर्ण होण्याआधीच तिचा संसार उद्ध्वस्त झाला. हत्येनंतर तिचा पती रिंकू उर्फ कमल किशोर हा महाराष्ट्रातून गावी परतला. शुक्रवारी दुपारी घरी पोहोचल्यावर पत्नीचा मृतदेह पाहून त्याने एकच हंबरडा फोडला. अवघ्या 28 दिवसांपूर्वीच मी तिला सोडून कामावर गेलो होतो, अशा शब्दांत त्याने आपले दुःख व्यक्त केले.

Crime News

Crime News

मुंबई तक

• 02:32 PM • 21 Feb 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

नवरा महाराष्ट्रातून घरी पोहोचला

point

बायकोचा मृतदेह बघून फोडला हंबरडा

point

पोलिस तपासात भयंकर माहिती उघड

Crime News : एका नराधम भावाने आपल्या मोठ्या बहिणीची गळा आवळून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. उमाकांती (26) असे मृत महिलेचे नाव असून, लग्नाला अवघे तीन महिने पूर्ण होण्याआधीच तिचा संसार उद्ध्वस्त झाला. हत्येनंतर तिचा पती रिंकू उर्फ कमल किशोर हा महाराष्ट्रातून गावी परतला. शुक्रवारी दुपारी घरी पोहोचल्यावर पत्नीचा मृतदेह पाहून त्याने एकच हंबरडा फोडला. अवघ्या 28 दिवसांपूर्वीच मी तिला सोडून कामावर गेलो होतो, अशा शब्दांत त्याने आपले दुःख व्यक्त केले.

हे वाचलं का?

हे ही वाचा : नागपुरात 37 वर्षीय महिलेवर 34 वर्षीय तरुणाचा बलात्कार... तिच्या मुलीसोबत देखील अश्लील कृत्य! प्रॉपर्टी डीलर अटकेत

भावानेच केली हत्या

उत्तर प्रदेशातील उन्नावमधील ही घटना आहे. उमाकांतीचे लग्न 30 नोव्हेंबर 2025 रोजी झाला होता. आरोपी भाऊ अजय हा बुधवारी बहिणीला माहेरी घेऊन  येण्यासाठी गेला होता. मात्र, रात्रीच्या वेळी त्याने बहिणीची गळा दाबून तिचा खून केला. विशेष म्हणजे, अजयने बहिणीचे सोन्याचे दागिने आणि दोन मोबाईल एका पिशवीत बांधून कालव्यात फेकून दिले. हत्येनंतर पोलिसांनी मृतदेहाचे पोस्ट मार्टम केले, मात्र पती महाराष्ट्रात असल्याने अंत्यसंस्कारासाठी त्याची प्रतीक्षा केली जात होती. शुक्रवारी पती रिंकू गावी परतल्यानंतर उमाकांतीवर अंत्यसंस्कार करण्यात आले. 

वडिलांची भूमिका काय?

या क्रूर कृत्यामुळे संतापलेल्या वडिलांनी आपल्या मुलाचा त्याग करण्याचा निर्णय घेतला आहे. वडील रामनरेश यांनी स्पष्ट केले की, ते तुरुंगात गेलेल्या अजयची कोणत्याही प्रकारची बाजू घेणार नाहीत किंवा त्याच्या सुटकेसाठी प्रयत्न करणार नाहीत. 'जो स्वतःच्या मोठ्या बहिणीला मारू शकतो, तो भविष्यात कोणाचेही आयुष्य संपवू शकतो, त्यामुळे त्याचे तुरुंगात राहणेच योग्य आहे,' अशी उद्विग्न प्रतिक्रिया पित्याने दिली. हत्येपूर्वी अजयला त्याच्या वडिलांनी 17 हजार रुपयांच्या चोरीच्या आरोपावरून घरातून हाकलले होते, तेव्हा तो पाच दिवस आपल्या प्रेयसीच्या घरी लपून बसला होता.

हे ही वाचा : अंगणात खेळत असलेल्या चिमुकलीला शेजाऱ्याने उचलून नेलं, 2.5 किलोमीटर दूर नेऊन निर्जनस्थळी अत्याचार

पोलिस तपास काय सांगतो?

आरोपीने सांगितले की, 'वडील माझं काहीच ऐकत नाही. ते फक्त बहिणीचंच ऐकतात. याच्या रागातूनच मी तिची हत्या केली.' दरम्यान, पोलिसांनी सांगितले की, आरोपीने गुन्ह्याचा पुरावा नष्ट करण्यासाठी दागिने आणि मोबाईल पिशवीत भरून कालव्यात फेकले होते. पिशवीत हवा असल्याने ती पाण्यावर तरंगत लांब वाहून गेली असावी, असा पोलिसांचा अंदाज आहे. अजयचा याआधीचा गुन्हेगारी स्वभाव आणि चोरीच्या सवयीमुळे घरात आधीच तणाव होता, परंतु तो बहिणीचा जीव घेईल अशी कल्पना कोणालाही नव्हती. पोलीस सध्या या प्रकरणाचा सखोल तपास करत असून अजय पोलीस कोठडीत आहे.
 

    follow whatsapp