Crime News: विवाहबाह्य संबंधातून बऱ्याच धक्कादायक घटना घडत असल्याचं पाहायला मिळतं. उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथे अशीच एक बातमी समोर आली आहे. एका महिलेला आपल्या पतीचे दुसऱ्याच महिलेसोबत प्रेमसंबंध सुरू असल्याचा संशय होता. याच संशयातून तिने तिच्या पतीचा पाठलाग केला आणि तिचा संशय ठरला. संबंधित महिलेला आपल्या पतीला त्याच्या प्रेयसीसोबत हॉटेलमध्ये रंगेहात पकडलं. दोघांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला असता महिलेने त्यांना बेदम मारहाण केल्याचं सांगितलं जात आहे.
ADVERTISEMENT
केस ओढून प्रेयसीला मारहाण...
या घटनेमुळे हॉटेलच्या परिसरात गर्दी जमा झाली. त्यावेळी, कोणीतरी पोलिसांनी यासंदर्भात माहिती दिली आणि पोलीस तातडीने घटनास्थळी पोहचले. त्यानंतर, महिलेचा पती आणि त्याच्या प्रेयसीला पोलीस ठाण्यात नेण्यात आलं. दरम्यान, कारमध्ये बसलेल्या पत्नीने पतीच्या प्रेयसीचे केस ओढून तिला मारहाण केली.
प्रेयसीला मारहाण होत असल्याचं पाहून महिलेच्या पतीने तिला थांबवण्याचा प्रयत्न केला. भररस्त्यात जवळपास अर्धा तास हा प्रकार सुरू होता. यानंतर, पोलिसांनी कसं तरी महिलेला असं कृत्य करण्यापासून रोखलं आणि ते तिच्या पती तसेच प्रेयसीला पोलिस ठाण्यात घेऊन गेले. खरंतर, घटनास्थळी बराच काळ पोलिसांनी आरोपी पती आणि महिलेला समजवण्याचा प्रयत्न केला, पण कोणीच त्यांचं ऐकायला किंवा माघार घ्यायला तयार नव्हतं. त्यानंतर, पोलिसांनी त्या तरुणाला त्याच्या प्रेयसीसोबत गाडीत बसवून पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेले.
हे ही वाचा: ठाणे: पत्नी आणि तिच्या प्रियकराने केलं किडनॅप! बेदम मारहाण करत नदीत फेकलं अन्... नेमकं प्रकरण काय?
पतीचे विवाहबाह्य संबंध असल्याचा संशय
संबंधित घटनेचा व्हिडीओ सुद्धा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. येथील खजनी परिसरात राहणाऱ्या महिलेचं तीन वर्षांपूर्वी त्या तरुणासोबत लग्न झालं होतं. दोघांना एक दीड वर्षांची मुलगी सुद्धा आहे. लग्नाच्या काही वर्षांनंतर, पत्नीला आपल्या पतीचे विवाहबाह्य संबंध असल्याचा संशय होता. त्यामुळे ती नेहमी आपल्या पतीवर लक्ष ठेवून होती. अखेर, पतीचा पाठलाग केल्यानंतर तिने त्याला हॉटेलमध्ये गर्लफ्रेंडसोबत रंगेहात पकडलं. ही घटना 19 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता घडल्याचं सांगितलं जात आहे. संबंधित महिलेला तिचा पती गीडा परिसरातील नौसडमधील एका हॉटेलमध्ये त्याच्या प्रेयसीसोबत असल्याची माहिती मिळाली होती.
हे ही वाचा: बुलढाण्यात खळबळ! हॉटेलच्या खोलीत सापडले प्रेमी युगुलांचे मृतदेह, प्रेयसीची हत्या अन् प्रियकराने... नेमकं काय घडलं?
दुपारी जवळपास 12 वाजताच्या सुमारास महिलेने आपल्या पतीला प्रेयसीसोबत रंगेहात पकडलं. अचानक तिथे आरोपी तरुणाच्या पत्नीला पाहताच प्रेयसीला मोठा धक्का बसला आणि ती ओरडू लागली. त्यावेळी पत्नीने आपल्या पतीच्या प्रेयसीच्या कानाखाली मारण्यास सुरूवात केली. इतकेच नव्हे तर, तिचे केस ओढून तिला बेदम मारहाण करू लागली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित महिलेकडून या प्रकरणाबाबत कोणतीच तक्रार दाखल झाली नसून याबाबत कोणतीही तक्रार आल्यानंतर कारवाई केली जाणार.
ADVERTISEMENT
