ठाणे: पत्नी आणि तिच्या प्रियकराने केलं किडनॅप! बेदम मारहाण करत नदीत फेकलं अन्... नेमकं प्रकरण काय?
महिलेने तिचा प्रियकर आणि त्याच्या दोन साथीदारांसोबत मिळून आपल्या पतीचं अपहरण केलं आणि त्याला ठाण्यातील खरेगाव खाडीत फेकून दिलं.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

पत्नी आणि तिच्या प्रियकराने केलं किडनॅप!

बेदम मारहाण करत नदीत फेकलं अन्...

ठाण्यातील धक्कादायक घटना
Thane Crime: ठाण्यात एक धक्कादायक घटना घडल्याचं समोर आलं आहे. येथे एका महिलेला आपल्या प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आल्याची माहिती आहे. महिलेने तिचा प्रियकर आणि त्याच्या दोन साथीदारांसोबत मिळून आपल्या पतीचं अपहरण केलं आणि त्याला ठाण्यातील खरेगाव खाडीत फेकून दिलं. सुदैवाने, नदीत फेकून दिल्यानंतर पीडित तरुणाने नदीच्या पुलाच्या खांबाला धरून ठेवलं आणि रात्रभर तो त्याच अवस्थेत होता. सकाळी स्थानिकांनी ही धक्कादायक घटना पाहिली आणि त्यांनी त्या तरुणाचा जीव वाचवला.
प्रकरणातील पीडित तरुण हा ठाण्यातील वांगणी शहरात चामड्याच्या बॅग्स विकून स्वत:चं घर चालवतो. 2008 मध्ये तरुणाची एका महिलेसोबत ओळख झाली आणि त्यावेळी संबंधित महिला विवाहित होती, अशी माहिती पीडित तरुणाने दिली. ती नेहमी आपल्या मित्राला म्हणजेच पीडित तरुणाला पतीकडून होणाऱ्या जाचाबद्दल सांगायची. कालांतराने, त्याला महिलेविषयी सहानुभूती वाटू लागली आणि ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले.
लिव्ह इन मध्ये राहिले आणि नंतर लग्न...
काही काळानंतर, त्या महिलेला तिच्या पतीने सोडून दिलं आणि त्यानंतर ती तरुणासोबत राहू लागली. त्या दोघांमध्ये चांगलं नातं निर्माण झालं आणि त्यांनी लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर, 2012 मध्ये दोघांनी एकमेकांसोबत लग्न केलं आणि 2016 मध्ये या जोडप्याला एक मुलगा सुद्धा झाला.
शेजारच्या तरुणासोबत झाले प्रेमसंबंध...
काही काळानंतर, त्या महिलेचे तिच्या शेजारी राहणाऱ्या तरुणासोबत संबंध निर्माण झाले. पत्नीच्या विवाहबाह्य संबंधाबद्दल कळताच, पती आणि पत्नीमध्ये मोठं भांडण झालं. त्यानंतर, महिलेनं आपल्या पतीला शेजारच्या तरुणासोबत प्रेमसंबंध असून त्याच्यासोबत राहणार असल्याचं उघडपणे सांगितलं. पत्नीच्या अशा वागण्यामुळे पती रागाच्या भरात घर सोडून निघून गेला. मात्र, कौटुंबिक वादामुळे एक जीवघेणा कट रचण्यात आल्याचं पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं.