Wife Killed 2 Husband Crime News : काही महिलांना प्रेमप्रकरणामुळं तर काहींनी सूड घेण्याच्या भावनेतून पतीचा खून केल्याचं अनेक घटनांच्या माध्यमातून समोर आलं आहे. पण पश्चिम बंगालच्या कोलकातामध्ये असं काही घडलं आहे, ज्यामुळे सर्वांनाच हादरा बसला आहे. एका महिलेनं तिच्या 2-2 पतींचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली. बैगुआटीमध्ये घडलेल्या या खतरनाक हत्याप्रकरणात जे सत्य समोर आलं आहे, ते सर्वांनाच थक्क करणारं आहे.
ADVERTISEMENT
मागील आठवड्यात बुधवारी बैगुआटीमध्ये भोला हलदर नावाच्या व्यक्तीची हत्या झाली होती. भोला कोलकाता विमानतळावर काम करत होता. परंतु, राहत्या घरी बाथरूममध्ये भोलाचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली. आरोपी पत्नीनं त्याच्यावर धारदार शस्त्राने इतके वार केले होते की, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वी त्याचा मृत्यू झाला. पतीची हत्या केल्यानंतर पत्नी घटनास्थळाहून फरार झाली.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
कोलकाता पोलिसांना बुधवारी बैगुआटी घटनेबाबत माहिती मिळाली. शेजारच्या लोकांनी सांगितलं की, भोला आणि त्याची पत्नी उपासना इथेच भाड्याच्या घरात राहत होते. दोघांचंही हे दुसरं लग्न होतं. बुधवारी अचानक त्यांच्या घरातून काहीतरी जळल्याचा वास आला. शेजारच्यांनी पाहिलं तर उपासना कागदपत्रे जाळत होती. भोला घरी नाही, असं तिने शेजारच्यांना सांगितलं आणि तिथून ती फरार झाली. पण शेजारच्या लोकांनी घराच्या बाथरूममध्ये भोला रक्तबंबाळ अवस्थेत असल्याचं पाहिलं. त्यानंतर त्यांनी त्याला रुग्णालयात नेलं. परंतु, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.
हे ही वाचा >> इन्स्टाग्रामवर ओळख झाली..पाकिस्तानी तरुणाने विद्यार्थीनीला लग्नाचं प्रॉमिस केलं, बॉर्डर पार करण्याचा प्लॅन केला, पण पोलिसांनी...
दरम्यान, पोलिसांनी आरोपी पत्नी उपासनाची कसून चौकशी केली, तेव्हा समोर आलं की, आरोपी महिलेच्या पहिल्या पतीचाही संशयास्पद मृत्यू झाला होता. त्याने आत्महत्या केल्याचं उघडकीस आलं होतं. सासरच्या लोकांनी आरोपी उपसनावर पतीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याची तक्रार पोलिसांत केली होती. त्यानंतर ती काश्मीरला पळून गेली होती. दहा महिन्यानंतर ती परत आली. तेव्हा पोलिसांनी तिला अटक केलं. त्यानंतर तिला जामीन मिळालं आणि तिने भोलाशी लग्न केलं. भोलाचा खून करण्यासाठी आरोपी महिलेला तिच्या प्रियकराने शस्त्र पुरवले होते. पोलिसांनी महिलेचा प्रियकर सुभा राजबांगशी उर्फ पोटला याला अटक केलीय.
हे ही वाचा >> विवाहित पुरुषाने दुसऱ्याच तरुणीसोबत केलं लग्न आणि घरी आणलं, पत्नी समोर आली अन्..
ADVERTISEMENT
