Husband Killed Wife : मोतिहारी जिल्ह्यातील पिपराकोठी पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक धक्कादायक घटना घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. येथे राहणारा सुबोध मांझी नावाचा व्यक्ती मजुरी करायचा. चार दिवसांपूर्वीच तो त्याच्या सासरी आला होता. पण तिथे आल्यानंतर पतीने पत्नीसोबत असं काही केलं, जे वाचून तुम्हाला धक्काच बसेल. नेमंक प्रकरण आहे तरी काय? जाणून घेऊयात.
ADVERTISEMENT
सुबोध मांझी चार दिवसांपूर्वीच त्याच्या सासरी आला होता. दोघांमध्ये काही दिवसांपासून बिनसलं होतं. मालती तिच्या माहेरी राहत होती. त्यांना एक पाच वर्षांचा मुलगा आहे. रिपोर्टनुसार, सुबोध मांझी पाच दिवसांपूर्वी सासरी आला होता आणि घराच्या बाहेर झोपला होता. त्याचदरम्यान त्याने त्याच्या पत्नीला अन्य पुरुषासोबत नको त्या अवस्थेत पाहिलं. त्यामुळे प्रचंड रागावलेल्या पतीने कुऱ्हाडीने वार करत पत्नी मालतीची हत्या केली. त्यानंतर तिचा जागीच मृत्यू झाला.
हे ही वाचा >> मुंबईची खबर: रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! प्लॅटफॉर्मवर गर्दी कमी होणार... 'ही' खास ट्रेन लवकरच धावणार
पती झाला फरार आणि नंतर घडलं..
पत्नीची हत्या केल्यानंतर तिचा पती घटनास्थळावरून फरार झाला. घटनेची माहिती मिळताच डीएसपी जितेश पांडे यांच्या नेतृत्त्वात पिपरा कोठी पोलिसांची टीम तिथे पोहोचली. पोलिसांनी तातडीनं कारवाई करत आरोपीला मुफ्फसील पोलीस स्टेशनच्या हद्दीत पकडलं.
प्राथमिक तपासा हे स्पष्ट झालं आहे की, आरोपीने पत्नीच्या अनैतिक संबधाला वैतागून हत्येचं पाऊल उचललं. मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला आहे. आरोपीला तुरुंगात पाठवण्याची प्रक्रिया सुरु आहे. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांकडून सखोल तपास सुरु आहे.
हे ही वाचा >> मुंबईची खबर: रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! प्लॅटफॉर्मवर गर्दी कमी होणार... 'ही' खास ट्रेन लवकरच धावणार
ADVERTISEMENT
