धावत्या एक्सप्रेसमध्ये 35 लाखांवर डल्ला, पर्समध्ये दागिने ठेवून झोपलेल्या महिलेसोबत काय घडलं? हिस्ट्री शिटर चोर...

ही घटना गुरुवारी रात्री घडली. पीडित महिला प्रवास करत असताना ट्रेनमध्ये झोपली. पण झोपण्यापूर्वी या महिलेनं आपले सगळे दागिने पर्समध्ये ठेवले होते. पोलिसांनी अत्यंत शिताफीने चोर शोधला.

Mumbai Tak

मुंबई तक

24 Jun 2025 (अपडेटेड: 24 Jun 2025, 10:59 AM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

धावत्या ट्रेनमध्ये महिलेच्या दागिन्यांची चोरी

point

35 लाख रुपयांच्या दागिन्यांवर डल्ला

Crime News : इंदोर-दौंड एक्सप्रेसमध्ये चालत्या रेल्वेत एका मोठ्या दरोड्यासारखी चोरी झाल्याची घटना घडली. या एक्सप्रेसमधून प्रवास करणाऱ्या एका वृद्ध महिलेच्या 35 लाख रुपये किमतीच्या दागिन्यांसह रोख रकमेची चोरी झाली. मुंबई क्राइम ब्रांच आणि रेल्वे पोलिसांच्या संयुक्त कारवाईत या प्रकरणातील आरोपी, हिस्ट्रीशीटर महेश घाग उर्फ विक्की याला महाराष्ट्रातील चिपळूनमधून अटक केली आहे.

हे वाचलं का?

झोपण्यापूर्वी पर्समध्ये ठेवलं सामान

ही घटना गुरुवारी रात्री घडली. पीडित महिला प्रवास करत असताना ट्रेनमध्ये झोपली. पण झोपण्यापूर्वी या महिलेनं आपले सगळे दागिने पर्समध्ये ठेवले. मोत्याच्या माळा, हिरे जडवलेल्या बांगड्या, अंगठ्या, सोन्याचं घड्याळ, साखळी आणि रोख रक्कम असा जवळपास 35 लाखांचा ऐवज पर्समध्ये ठेवला. पण शुक्रवारी सकाळी ट्रेन कल्याण स्थानकावर पोहोचली, तेव्हा तिला आपली पर्स चोरीला गेल्याचं समजलं. महिला पुरती हादरली आणि तातडीनं रेल्वे पोलीस चौकी गाठली. 

हे ही वाचा >> "लय घाण बोलेन...", म्हणत कानाखाली मारली, महिला पोलिसाची ट्रिपल सिट स्कुटी पळवणाऱ्या मुलींना शिवीगाळ

35 लाखांच्या दागिन्यांची चोरी

महिलेच्या तक्रारीवरून कल्याण रेल्वे पोलीस आणि मुंबई क्राइम ब्रांचने तातडीने तपास सुरू केला. स्थानकावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फुटेजमध्ये एक संशयित व्यक्ती घाईघाईने ट्रेनमधून उतरताना दिसला. तपासातून स्पष्ट झालं की, तो संशयित कोणी दुसरा नसून कुख्यात गुन्हेगार महेश घाग आहे. त्याच्यावर यापूर्वी अनेक गुन्हे दाखल आहेत.

हिस्ट्रीशीटर आरोपीला अटक

हे ही वाचा >> पोलीस सांगून गाडीत बसवत अपहरण, चाकू लावून 50 लाखांची बॅग घेतली आणि फेकून दिलं... हादरवून टाकणारी घटना

पोलिसांनी अवघ्या 12 तासांत चिपळूनमधून महेश घागला अटक केली. त्याच्याकडून चोरीला गेलेले सर्व दागिने आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. सध्या या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.

    follow whatsapp