Chandrakant Patil : "देवेंद्रजींना कोणत्याही क्षणी अटक होणार होती", पाटलांचा गौप्यस्फोट

भागवत हिरेकर

18 Apr 2024 (अपडेटेड: 18 Apr 2024, 09:44 AM)

Chandrakant Patil Statement : भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या विधानाबद्दल देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

चंद्रकांत पाटील देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल काय बोलले?

देवेंद्र फडणवीस यांना अटक होणार होती, चंद्रकांत पाटील यांचा दावा.

follow google news

Chandrakant Patil on Devendra Fadnavis : भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या एका गौप्यस्फोटाने खळबळ उडाली आहे. महाविकास आघाडीचे सरकार असताना देवेंद्र फडणवीस यांना अटक केली जाणार होती, असा दावा पाटील यांनी केला आहे. त्याला देवेंद्र फडणवीस यांनीही दुजोरा दिला आहे.

हे वाचलं का?

लोकसभा निवडणुकीचा प्रचार तापलेला असतानाच चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या विधानाची चांगलीच चर्चा सुरू आहे. चंद्रकांत पाटील यांनी एका कार्यक्रमात बोलताना महाविकास आघाडीच्या काळात त्रास सहन करावा लागला असे कार्यकर्त्यांना सांगितलं. 

देवेंद्र फडणवीसांबद्दल चंद्रकांत पाटील काय बोलले?

"मी राज्याचा अध्यक्ष होतो. ३३ महिने काय सहन केलं आम्हालाच माहिती आहे. कुठल्याही क्षणी देवेंद्रजींना अटक होणार होती. मला खात्री होती... मला खात्री होती की ये भी दिन जायेंगे... ते गेले दिवस. जानेवारीमध्ये एकनाथजी मुख्यमंत्री झाले. त्यामुळे या कामाची चिंता परमेश्वराला आहे.

हेही वाचा >> महायुतीचा 'त्या' जागांवरील पेच सुटला? कोणती जागा कुणाला? 

फडणवीस म्हणाले, "त्यांना काहीही सापडलं नाही"

चंद्रकांत पाटील यांच्या विधानावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "नाही, हे तर मी सांगितलंच आहे. कशा प्रकारचं कटकारस्थान त्यावेळस होत होतं. त्यांना सापडतच काही नव्हतं. प्रयत्न खूप केलेत. खोट्या केसेस तयार करण्याचे प्रयत्न केला. अनेक गोष्टी केल्या. त्यासंदर्भात अजून कधीतरी सविस्तर बोलेन." 

माढ्याची निवडणूक जास्त कठीण -चंद्रकांत पाटील

चंद्रकांत पाटील यांनी याच कार्यक्रमात बोलताना माढा लोकसभा मतदारसंघातील निवडणूक जास्त कठीण असल्याचे म्हटले आहे. 

"सोलापूरची निवडणूक इतकी कठीण नाहीये. माढ्याची थोडीशी कठीण नव्हती, ती कठीण केली गेलेली आहे. परंतू एक सांगतो की हे कार्य ईश्वरी कार्य आहे. कारण ईश्वराला त्याची काळजी आहे", असे पाटील म्हणाले.

हेही वाचा >> मोदी सरकार 400 पार की INDIA आघाडी करणार पलटवार करणार? 

पण, त्यांच्या भूमिकेशी फडणवीसांनी असहमती दर्शवली. ते म्हणाले, "नाही... नाही. बिलकूल... माढ्याची लढाई काही अवघड नाही. माढ्याची लढाई ही भाजप निश्चितपणे जिंकेल", असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. 

    follow whatsapp