Lok Sabha Election 2024: मोठी बातमी.. राज ठाकरेंनी भर सभेत 'यांना' जाहीर केला बिनशर्त पाठिंबा

मुंबई तक

09 Apr 2024 (अपडेटेड: 09 Apr 2024, 10:33 PM)

Raj Thackeray Mns Padwa Melava: मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी त्यांच्या पाडवा मेळाव्यातील भाषणात लोकसभा निवडणूक 2024 साठी भाजपला आपला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे.

पाहा राज ठाकरेंनी कोणाला जाहीर केला पाठिंबा

पाहा राज ठाकरेंनी कोणाला जाहीर केला पाठिंबा

follow google news

Raj Thackeray unconditional support to BJP for PM Modi: मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्यापासून त्यांच्या पक्षाविषयी वेगवेगळ्या चर्चां सुरू होत्या. राज ठाकरे हे भाजपसोबत युती करणार या चर्चांना अधिक उधाण आलं होतं. मात्र, आज (9 एप्रिल) मनसेच्या पाडवा मेळाव्यात बोलताना राज ठाकरेंनी एक प्रचंड मोठी घोषणा केली आहे. 

हे वाचलं का?

2019 साली ज्या राज ठाकरेंनी मोदी-शाहांविरोधात प्रचार केला होता. त्याच पंतप्रधान मोदींसाठी राज ठाकरेंनी लोकसभा निवडणूक 2024 साठी मनसेचा भाजप आणि महायुतीला बिनशर्त पाठिंबा असल्याची जाहीर घोषणा केली आहे.

'माझा भाजपला बिनशर्त पाठिंबा..', वाचा राज ठाकरे नेमकं काय म्हणाले...

'मला काहीही अपेक्षा नाही महाराष्ट्र नवनिर्माण भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला जाहीर पाठिंबा देत आहे. पण फक्त नरेंद्र मोदींसाठी बिनशर्त पाठिंबा देत आहे. हे मी आपल्यासमोर जाहीर करतो.' 

महाराष्ट्र नवनिर्माण सेना 'भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी'च्या महायुतीला बिनशर्त पाठिंबा देत आहे... आम्हाला राज्यसभा नको, बाकीच्या वाटाघाटी नको हा पाठिंबा फक्त नि फक्त नरेंद्र मोदींसाठी आहे.

'माझ्या सर्व महाराष्ट्र सैनिकांना हे सांगायचं आहे की, विधानसभेच्या तयारीला लागा.. जोरात विधानसभेच्या तयारीला लागा.. पुढच्या गोष्टी पुढे.. आता कसलाही विचार न करता आपण बांधणीचा विचार केला पाहिजे.. त्यासाठी मी तुम्हाला महाराष्ट्रभर भेटण्यासाठी लवकरच आपल्यासोबत येत आहे.' 

हे ही वाचा>> मोठी बातमी, राज ठाकरेंकडून 'यांना' बिनशर्त पाठिंबा जाहीर

'आज मला जे काही मांडायचं होतं ते मी मांडलं आहे.. उद्या समजा समोरच्यांची अजून काही पकपक झाली तर.. अजून माझ्या तोंडाच्या दारं-खिडक्या उघड्या करायला मी मोकळा आहे. आपण निश्चिंत राहा..' असं राज ठाकरे यावेळी म्हणाले.

राज ठाकरेंनी 2019 लोकसभा निवडणुकीला केलेला मोदी-शाहांना विरोध!

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान मोदी-शाहांविरोधात तुफान प्रचार केला होता. राजकीय क्षितीजावरून मोदी-शाह ही जोडगोळी नाहीशी झाली पाहिजे अशी जहरी टीका राज ठाकरेंनी केली होती. 

मात्र, 2024 च्या लोकसभा निवडणुकीत आपण केवळ पंतप्रधान मोदींसाठी भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला बिनशर्त पाठिंबा देण्याची भूमिका आता राज ठाकरेंनी घेतली आहे.

हे ही वाचा>> Nana Patole : सांगली, भिवंडीची जागा काँग्रेसने का सोडली?

आतापर्यंत अनेकदा राज ठाकरेंनी त्यांच्या राजकीय भूमिका बदलल्या आहेत. आता पुन्हा एकदा तशाच स्वरुपाची भूमिका त्यांनी घेतली असल्याने आता मनसेचे कार्यकर्ते निवडणुकीत नेमकं कोणाला मतदान करणार याकडेच सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.

 

 

    follow whatsapp