Sharad Pawara: एकनाथ खडसेंची आमदारकी जाणार का?, शरद पवारांचं मोठं विधान..

मुंबई तक

11 Apr 2024 (अपडेटेड: 11 Apr 2024, 06:21 PM)

eknath khadse mlc: एकनाथ खडसे हे भाजपमध्ये पुन्हा प्रवेश करणार असल्याने त्यांची आमदारकी रद्द होणार का? या प्रश्नावर शरद पवार यांनी आता उत्तर दिलं आहे.

एकनाथ खडसेंची आमदारकी जाणार का?

एकनाथ खडसेंची आमदारकी जाणार का?

follow google news

Eknath Khadse MLC: ओमकार वाबळे, पुणे: राष्ट्रवादी काँग्रेस - शरदचंद्र पवार गटाचे नेते आणि विधानपरिषदेचे आमदार एकनाथ खडसे हे लवकरच भाजप प्रवेश करणार आहेत. मात्र, यामुळे त्यांची आमदारकी धोक्यात येऊ शकते. याचबाबत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज (11 एप्रिल) पुण्यातील पत्रकार परिषदेत खडसेंच्या आमदारकीबाबत एक मोठं विधान केलं आहे. (lok sabha election 2024 will eknath khadse mlc be cancelled sharad pawar gave the exact answer)

हे वाचलं का?

लोकसभा निवडणूक 2024 च्या अगदी तोंडावर एकनाथ खडसे हे भाजपमध्ये जात असल्याने शरद पवार गटाला जळगाव आणि रावेरमध्ये मोठा धक्का बसू शकतो. मात्र, एकनाथ खडसे हे केवळ दबावामुळे भाजपमध्ये परत जात असल्याचं शरद पवार यांनी यावेळी सांगितलं.

पाहा शरद पवार एकनाथ खडसेंबाबत नेमकं काय म्हणाले... 

'एकनाथ खडसेंच्या इतक्या चौकशा सुरू केल्या. त्यांची वैयक्तिगत संपत्ती जेवढी असेल नसेल तेवढी सगळी त्यावर.. दैंनदिन कुटुंब चालविण्यासाठी जी आवश्यकता असते त्याची उपयुक्तता ही सुद्धा करता येत नाही एवढी टोकाची भूमिका सत्ताधाऱ्यांनी त्यांच्या बद्दलची घेतली आहे. त्यामुळे ते हतबल झाले आहेत.' 

'ज्या काही यातना त्यांना सहन कराव्या लागतायेत. त्यामुळे आम्ही त्यांना सांगितलं की, जिथून तुम्हाला दिलासा मिळेल तिथून तुम्ही गेलात तर आम्ही गैरसमज करून घेणार नाहीत. त्यामुळे आम्ही त्यांना दोष देणार नाही.'

खडसेंच्या आमदारकीबाबत पवारांचं मोठं विधान

दरम्यान, याचवेळी एकनाथ खडसेंच्या आमदारकीबाबतही शरद पवार यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी पवार फक्त एवढंच म्हणाले की, 'असं आहे की, एकदा दिलेल्या गोष्टी परत घ्यायच्या नसतात..'

याचाच अर्थ जरी एकनाथ खडसे हे भाजपमध्ये गेले तरी शरद पवार हे त्यांची आमदारकी रद्द होण्यासाठी कोणतीही कारवाई करणार नाहीत.  

खडसेंचा पुन्हा होणार भाजप प्रवेश व्हाया राष्ट्रवादी काँग्रेस.. 

2014 विधानसभा निवडणुकीनंतर भाजपने एकनाथ खडसेंऐवजी देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री बनवल्यामुळे खडसे हे प्रचंड नाराज झाले होते. त्यानंतर वर्षभरातच एका जमीन प्रकरणात त्यांना त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. तर 2019 ला त्यांना भाजपकडून विधानसभेचं तिकीट देखील नाकारण्यात आलं. 

दरम्यान, 2019 ला राज्यात सत्तांतर झाल्यानंतर एकनाथ खडसे यांनी काही महिन्यातच भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांना विधान परिषदेची आमदारकी देखील मिळाली. मात्र, त्यानंतर काही दिवसातच राज्यात पुन्हा भाजप सत्तेत आलं. 

असं असताना आता लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर एकनाथ खडसेंनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडून पुन्हा भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे.

    follow whatsapp