पंधरा दिवसात पोटची दोन्ही मुलं मारली; उंदीर मारण्याचं औषध पाजून संपवलं, प्रियकरासोबत मिळून आईने 'असा' रचला कट

Crime News : आपल्या अनैतिक प्रेमसंबंधांमध्ये अडसर ठरत असलेल्या पोटच्या दोन चिमुरड्यांची एका आईने विष देऊन हत्या केली. ज्या आईच्या कुशीत मुले स्वतःला सुरक्षित समजतात, त्याच आईने प्रियकरासोबत राहण्यासाठी आपल्या 12 वर्षांच्या मुलीचा आणि 7 वर्षांच्या मुलाचा बळी घेतल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. पंजाबच्या भटिंडामधील ही घटना आहे. एकाच घरातील दोन मुलं 15 दिवसांच्या आत मृत्यू झाल्याने गावकऱ्यांना संशय आला आणि त्यानंतर पुढं जे घडलं त्यामुळे माणसाच्या क्रूरतेचा एक चेहरा सर्वांसमोर आला.

Crime News

Crime News

मुंबई तक

15 Feb 2026 (अपडेटेड: 15 Feb 2026, 04:58 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

पंधरा दिवसात पोटची दोन्ही मुलं मारली

point

उंदीर मारण्याचं औषध पाजून संपवलं

point

प्रियकरासोबत मिळून आईन रचला कट

Crime News : आपल्या अनैतिक प्रेमसंबंधांमध्ये अडसर ठरत असलेल्या पोटच्या दोन चिमुरड्यांची एका आईने विष देऊन हत्या केली. ज्या आईच्या कुशीत मुले स्वतःला सुरक्षित समजतात, त्याच आईने प्रियकरासोबत राहण्यासाठी आपल्या 12 वर्षांच्या मुलीचा आणि 7 वर्षांच्या मुलाचा बळी घेतल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. पंजाबच्या भटिंडामधील ही घटना आहे. एकाच घरातील दोन मुलं 15 दिवसांच्या आत मृत्यू झाल्याने गावकऱ्यांना संशय आला आणि त्यानंतर पुढं जे घडलं त्यामुळे माणसाच्या क्रूरतेचा एक चेहरा सर्वांसमोर आला.

हे वाचलं का?

हे ही वाचा : मुंबई : मॅट्रोमोनियल वेबसाईटवर लग्नासाठी निवडलेला नवरा निघाला 4 मुलांचा बाप, 'एवढी' रक्कम लुटून झाला पसार

गावकऱ्यांचा संशय बळावला

एकाच कुटुंबातील दोन मुलांचा अवघ्या 15 दिवसांच्या अंतराने मृत्यू झाल्याने गावकऱ्यांच्या मनात संशयाची पाल चुकचुकली. मिळालेल्या माहितीनुसार, 15 दिवसांपूर्वी या महिलेच्या 12 वर्षांच्या मुलीचा अचानक मृत्यू झाला होता. त्यावेळी तिला एखादा आजार झाला असावा, असे समजून कुटुंबीयांनी आणि गावकऱ्यांनी कोणतीही पोलीस तक्रार न करता अंत्यसंस्कार केले. मात्र, शुक्रवारी रात्री 7 वर्षांच्या फतेहवीर या लहान मुलाचाही तशाच परिस्थितीत मृत्यू झाल्याने गावकऱ्यांचा संशय बळावला.

आईचे अनैतिक संबंध

शनिवारी (14 जानेवारी) सकाळी गावातील सरपंचांसह मोठ्या संख्येने नागरिक पोलीस ठाण्यात पोहोचले आणि त्यांनी आईच्या वर्तणूकीवर संशय व्यक्त केला. गावकऱ्यांनी आरोप केला की, या महिलेचे दुसऱ्या एका व्यक्तीशी प्रेमसंबंध होते आणि हे दोन्ही निष्पाप जीव तिच्या या नात्यात अडथळा ठरत होते. हा अडसर दूर करण्यासाठी तिने आपल्या मायेला तिलांजली देत मुलांना अन्नातून उंदीर मारण्याचे औषध देऊन त्यांची हत्या केली.

हे ही वाचा : पुतण्यासोबत लपून व्हॅलेंटाईन्स डे साजरा करत होती, नवऱ्याने पकडलं अन्..., सबंध गाव हादरलं!

हत्येचा गुन्हा दाखल

गावकऱ्यांच्या तक्रारीवरून आणि प्राथमिक तपासानंतर पोलिसांनी या आईविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. या संपूर्ण कटात तिच्या प्रियकराची भूमिका काय होती आणि मुलीच्या हत्येच्या वेळीही याच पद्धतीचा अवलंब केला होता का, याचा तपास पोलीस करत आहेत. एका हसत्या-खेळत्या घरातील दोन मुलं अशा प्रकारे विझल्याने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून आरोपी महिलेवर कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे.
 
    follow whatsapp