Dombivali News : डोंबिवलीतील सागाव परिसरात एका निवासी इमारतीच्या बेसमेंटमध्ये भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत 29 दुचाकी वाहने आणि काही सायकल जळून खाक झाल्याची माहिती समोर आली आहे. आग विझवण्याच्या प्रयत्नात पाच रहिवासी जखमी असून सुदैवाने मोठी जीवितहानी टळली. ही घटना 15 फेब्रुवारी रोजी रविवारी घडल्याचे वृत्त आहे. या घटनेनं परिसरात घबराट पसरली आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : मुंबईतील मुलुंड मेट्रोचा पूल कोसळला, पोलिसांची धडाकेबाज कारवाई, पाच जणांना पोलीस कस्टडी
डोंबिवलीत इमारतीला भीषण आग, रहिवाशांना श्वास घेण्यास त्रास
घडलेल्या घटनेनुसार, डोंबिवलीच्या सागावातील चेडानगर जय भारत स्कूलजवळ असलेल्या राज अपार्टमेंट आणि रवीकिरण सोसायटीला जोडलेल्या इमारतींच्या बेसमेंटमध्ये आग लागली होती, नंतर काही मिनिटांतच आगीने भीषण रूप घेतलं. आग वाढली आणि ती आग इमारतीच्या वरच्या मजल्यापर्यंत पोहोचली, अशातच रहिवाशांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला होता.
पाच जण गंभीरपणे जखमी
परिस्थिती बघता घटनास्थळी भीतीचे वातावरण पसरले. दरम्यान पाच जण गंभीरपणे जखमी झाले आहेत. या दुर्घटनेदरम्यान आगीसह धुराचे लोट पसरले होते. दरम्यान, जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. या घटनेची माहिती मिळताच कल्याण-डोंबिवली महापालिका अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.
हे ही वाचा : जालन्यातील SBI बँकेच्या वाड्रीगोद्री शाखेत मध्यरात्री दरोडा, गॅस कटरने शटर तोडलं, लाखो रुपये केले लुटून नेले
तासाभराचे बचाव कार्याचे काम सुरु होते, यात आगीवर नियंत्रण मिळवण्यास यश आले. या घटनेत लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. प्राथमिक तपासानुसार शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची शक्यता अधिक वर्तवण्यात येत आहे. या घटनेचा पोलीस आणि अग्निशमन दल सविस्तर चौकशी करत आहेत.
ADVERTISEMENT











