6 वर्षांच्या चिमुरडीवर वर्षभर लैंगिक अत्याचार, वडिलांसोबत घरात सापडला मृतदेह; पोस्ट-मार्टम रिपोर्टमध्ये धक्कादायक खुलासा

Crime News : काही दिवसांपूर्वी एका भाड्याच्या घरात वडील आणि सहा वर्षांच्या मुलीचा मृतदेह आढळला होता. आधी मुलीला विष देऊन तिला संपवले अन् वडिलांनी आत्महत्या केली. यामुळे सर्वजण हळहळ व्यक्त करत होते. मात्र पोस्ट मार्टम रिपोर्टनंतर सर्वांच्याच पायाखालची जमीन सरकली आहे. मृत्यूपूर्वी सहा वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार करण्यात आला होता. धक्कादायक म्हणजे गेल्या एक वर्षापासून चिमुरडीवर लैंगिक अत्याचार सुरु होते.

Crime News

Crime News

मुंबई तक

• 04:22 PM • 15 Feb 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

6 वर्षांच्या चिमुरडीवर वर्षभर लैंगिक अत्याचार, वडिलांसोबत घरात सापडला मृतदेह

point

पोस्ट-मार्टम रिपोर्टमध्ये धक्कादायक खुलासा

Crime News : काही दिवसांपूर्वी एका भाड्याच्या घरात वडील आणि सहा वर्षांच्या मुलीचा मृतदेह आढळला होता. आधी मुलीला विष देऊन तिला संपवले अन् वडिलांनी आत्महत्या केली. यामुळे सर्वजण हळहळ व्यक्त करत होते. मात्र पोस्ट मार्टम रिपोर्टनंतर सर्वांच्याच पायाखालची जमीन सरकली आहे. मृत्यूपूर्वी सहा वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार करण्यात आला होता. धक्कादायक म्हणजे गेल्या एक वर्षापासून चिमुरडीवर लैंगिक अत्याचार सुरु होते. केरळच्या कोचीमधील ही घटना आहे. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : मंदिरातून पूजा करुन परतत असताना पुजाऱ्याला संपवले, धारधार शस्त्राने केले 8 वार; गावकऱ्यांना वेगळाच संशय

कुटुंबात काय सुरु होतं?

कोची येथील एलमक्कारा परिसरात 16 जानेवारी रोजी ही हृदयद्रावक घटना घडली होती.  वडिलांनी आधी आपल्या सहा वर्षांच्या मुलीला विष दिले आणि त्यानंतर स्वतः भाड्याच्या घरात आत्महत्या केली. सुरुवातीला पोलिसांनी या प्रकरणाची नोंद 'आकस्मिक मृत्यू' अशी केली होती. मात्र, आता समोर आलेल्या वैद्यकीय पुराव्यांमुळे या घटनेमागील काळेबेरे उघड झाले असून, कुटुंबात नेमकं काय सुरू होतं, याबाबत मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

'अत्याचाराविषयी काहीच कल्पना नाही'

मुलीच्या आईने पोलिस चौकशी दरम्यान सांगितले की, कुटुंबाला अशा कोणत्याही अत्याचाराची पुसटशी कल्पना नव्हती. घटनेच्या दिवशी पैशांच्या वादावरुन पती-पत्नीमध्ये भांडण झाले होते. त्यानंतर ही टोकाची घटना घडली. आता लैंगिक अत्याचाराची बाब समोर आल्यानंतर पोलिसांनी या गुन्ह्यात 'पॉक्सो' कायद्यांतर्गत कलमे वाढवली असून, त्या नराधमाचा शोध घेण्यासाठी तपास अधिक तीव्र केला आहे.

हे ही वाचा : पुरुषाने केले दोन लग्न, दुसऱ्या बायकोच्या मुलाचा एक लाख रुपयांत केला सौदा... वडील मुलाच्या नात्याला काळीमा

पोलिस शिक्षकांशी संवाद साधणार

तपासाचा एक भाग म्हणून पोलीस आता मुलीच्या शाळेतील शिक्षकांशी संवाद साधणार आहेत, जेणेकरून तिच्या वागण्यातील बदलांबाबत काही माहिती मिळू शकेल. तसेच, घटनेच्या दिवशी घरामध्ये कोणी तिसरी व्यक्ती आली होती का, याचा शोध घेण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जात आहे. पोलीस लवकरच नातेवाईक आणि जवळच्या व्यक्तींचे जबाब नोंदवणार असून, या चिमुकलीच्या आयुष्याशी खेळणारा खरा गुन्हेगार कोण आहे, याचा शोध घेण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर आहे.
 

    follow whatsapp