Mumbai Crime News ,मुंबई : महाराष्ट्राची राजधानी मुंबईतील मानखुर्द परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका 19 वर्षीय तरुणीने 17 अल्पवयीन मुलाचे अपहरण करुन लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार घडलाय. एकतर्फी प्रेमातून आणि लग्नास नकार दिल्याने तरुणीने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे. या घटनेने मुंबईसह राज्यात खळबळ उडाली असून, आरोपी तरुणीवर POCSO कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय.
ADVERTISEMENT
मानखुर्द पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगा आणि आरोपी तरुणी एकाच परिसरात राहणारे आहेत. आरोपी तरुणीचे पीडित मुलावर एकतर्फी प्रेम होते आणि ती गेल्या काही महिन्यांपासून त्याच्यावर लग्नासाठी दबाव टाकत होती. या प्र+
या प्रकरणाची सुरुवात गेल्या वर्षी ऑगस्ट 2025 मध्ये झाली, जेव्हा आरोपी तरुणीने मुलाला फूस लावून आपल्या घरी बोलावले आणि त्याच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. इतकेच नाही, तर याबद्दल कोणाला सांगितल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकीही तिने दिली होती. ऑगस्ट 2025 ते फेब्रुवारी 2026 या सहा महिन्यांच्या कालावधीत आरोपी तरुणीने मुलाचा मानसिक आणि शारीरिक छळ सुरूच ठेवला. जेव्हा कधी ती घरी एकटी असे, तेव्हा ती मुलाला धमकी देऊन बोलावून घेत असे. तिच्या सततच्या दबावाला आणि धमक्यांना कंटाळून मुलाने अखेर तिच्याशी लग्न करण्यास ठाम नकार दिला. हा नकार सहन न झाल्याने तरुणीने आधी स्वतःला इजा पोहोचवण्याची धमकी दिली आणि नंतर संधी साधून मुलाचे अपहरण केले.
हेही वाचा : 'विधानसभा अध्यक्षासोबत ही हाणामारी कोठे आणि का झाली? त्यांनी पळ का काढला'; संजय राऊतांनी ट्वीट केला व्हिडीओ
पीडित मुलगा कसातरी आरोपीच्या तावडीतून निसटण्यात यशस्वी झाला आणि त्याने घरी पोहोचून आपल्या कुटुंबीयांना संपूर्ण आपबिती सांगितली. मुलाच्या शरीरावर आणि मनावर झालेले आघात पाहून कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. त्यांनी तात्काळ मानखुर्द पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. मानखुर्द पोलिसांनी या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पीडित मुलाचा जबाब नोंदवून घेतला. त्याआधारे, आरोपी तरुणीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या (BNS) अपहरण संबंधित कलमांखाली आणि लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (POCSO) कायद्याच्या विविध कलमांखाली एफआयआर (FIR) दाखल करण्यात आला आहे. पॉक्सो कायदा हा लहान मुलांना लैंगिक अत्याचारापासून संरक्षण देण्यासाठी बनवलेला एक अत्यंत महत्त्वाचा कायदा आहे, जो 18 वर्षांखालील कोणत्याही मुला-मुलीला संरक्षण प्रदान करतो.
आरोपी फरार, पोलिसांचा शोध सुरू
गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळताच आरोपी तरुणी फरार झाली आहे. मानखुर्द पोलीस तिचे लोकेशन ट्रेस करण्याचा प्रयत्न करत असून, तिला अटक करण्यासाठी एक विशेष पथक तयार करून शोधमोहीम तीव्र केली आहे. या घटनेमुळे समाजात एकतर्फी प्रेमातून होणाऱ्या गुन्हेगारीची भीषणता पुन्हा एकदा समोर आली आहे. तसेच, लैंगिक अत्याचाराच्या घटनांमध्ये केवळ महिलाच नव्हे, तर पुरुष आणि विशेषतः अल्पवयीन मुलेही बळी पडू शकतात, ही वस्तुस्थिती अधोरेखित झाली आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT











