मंदिरातून पूजा करुन परतत असताना पुजाऱ्याला संपवले, धारधार शस्त्राने केले 8 वार; गावकऱ्यांना वेगळाच संशय

Murder of Priest : मंदिरातून पूजा करुन परतत असताना एका 75 वर्षीय पुजाऱ्याची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. इंद्रभान द्विवेदी असं या पुजाऱ्याचं नाव आहे. मध्यप्रदेशातील सीधी जिल्ह्यातील ही घटना आहे. द्विवेदी हे कुसमी तालुक्यातील हनुमान मंदिरात अनेक वर्षांपासून पुजारी आहेत. या हत्येमागे जातीय कारण असल्याचे बोलले जात आहे. सध्या परिसरात तणावाचे वातावरण असून द्विवेदी यांच्या गावातील काही लोक त्वरित न्याय मिळावा या मागणीसाठी उपोषणाला बसले आहेत.

Murder of Priest

Murder of Priest

मुंबई तक

• 03:43 PM • 15 Feb 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

मंदिरातून पूजा करुन परतत असताना पुजाऱ्याला संपवले, धारधार शस्त्राने केले 8 वार

point

गावकऱ्यांना वेगळाच संशय

Murder of Priest : मंदिरातून पूजा करुन परतत असताना एका 75 वर्षीय पुजाऱ्याची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. इंद्रभान द्विवेदी असं या पुजाऱ्याचं नाव आहे. मध्यप्रदेशातील सीधी जिल्ह्यातील ही घटना आहे. द्विवेदी हे कुसमी तालुक्यातील हनुमान मंदिरात अनेक वर्षांपासून पुजारी आहेत. या हत्येमागे जातीय कारण असल्याचे बोलले जात आहे. सध्या परिसरात तणावाचे वातावरण असून द्विवेदी यांच्या गावातील काही लोक त्वरित न्याय मिळावा या मागणीसाठी उपोषणाला बसले आहेत.

हे वाचलं का?

हे ही वाचा : धाराशिवमध्ये मोठा राडा, काँग्रेस अन् ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; ZP निवडणुकीनंतर वाद उफाळला VIDEO

धारधार शस्त्राने आठ वार 

पुजारी इंद्रभान द्विवेदी आपल्या दुचाकीवरून जात असताना आरोपीने त्यांच्यावर धारदार शस्त्राने पाठीमागून हल्ला केला. आरोपीने सुरुवातीला चालत्या दुचाकीवर त्यांच्या मानेवर वार केला. lत्यामुळे ते जमिनीवर कोसळले. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, पुजारी खाली पडल्यानंतरही हल्लेखोर थांबला नाही. त्याने त्यांच्या छातीवर एकामागून एक सुमारे आठ वार केले. या भीषण हल्ल्यात द्विवेदींचा जागीच मृत्यू झाला.

विशिष्ट समाजाबद्दल मनात आकस

पुजारी इंद्रभान द्विवेदी हे अत्यंत शांत स्वभावाचे होते आणि त्यांचे कोणाशीही वैयक्तिक शत्रूत्व नव्हते, असे त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले आहे. याप्रकरणी लाला केवट नावाच्या व्यक्तीवर हत्येचा आरोप करण्यात आला आहे. काही स्थानिकांच्या मते, आरोपीच्या मनात विशिष्ट समाजाबद्दल आकस होता आणि त्यातूनच त्याने हे पाऊल उचलले असावे. मात्र, हत्येचे नेमके आणि अधिकृत कारण अद्याप पोलीस तपासात स्पष्ट झालेले नाही.

हे ही वाचा : पुतण्यासोबत लपून व्हॅलेंटाईन्स डे साजरा करत होती, नवऱ्याने पकडलं अन्..., सबंध गाव हादरलं!

न्याय मिळेपर्यंत उपोषण

या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थ आणि पुजाऱ्यांच्या नातेवाईकांनी त्वरित न्याय मिळावा यासाठी रस्त्यावर उतरुन आंदोलन सुरु केले आहे. आरोपीवर कठोर कारवाई करुन त्याचे घर पाडण्यात यावे, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरु आहे. सध्या परिसरात तणावाचे वातावरण असून न्याय मिळेपर्यंत उपोषण सुरु ठेवण्याचा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला आहे.
 
    follow whatsapp