Lok sabha Election 2024 : 'वंचित'ची दुसरी यादी जाहीर, मविआला बसणार झटका?

प्रशांत गोमाणे

31 Mar 2024 (अपडेटेड: 31 Mar 2024, 09:41 PM)

Vanchit bahujan aghadi second list : प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीने लोकसभा निवडणुकीसाठी दुसरी उमेदवारी यादी जाहीर केली आहे. या यादीत 11 उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. पहिल्या यादीत 8 नावाची घोषणा झाली होती.

prakash ambedkar declare vanchit bahujan aghadi second list declare 11 candidate lok sabha election 2024

प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीने लोकसभा निवडणुकीसाठी दुसरी उमेदवारी यादी जाहीर केली आहे.

follow google news

Vanchit bahujan aghadi second list : प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीने लोकसभा निवडणुकीसाठी दुसरी उमेदवारी यादी जाहीर केली आहे. या यादीत 11  उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. पहिल्या यादीत 8 नावाची घोषणा झाली होती. त्यामुळे आतापर्यंत वंचितने 19 जागेवर उमेदवारी जाहीर केली आहे.  (prakash ambedkar declare vanchit bahujan aghadi second list declare 11 candidate lok sabha election 2024) 

हे वाचलं का?

वंचितने हिंगोली मतदार संघातून डॉ. बी. डी चव्हाण यांना उमेदवार जाहीर केली आहे. तर लातूरमधून नरसिंह राव उदगीरकर यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. सोलापूरमधून राहुल गायकवाड यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवले आहे. त्यामुळे प्रणिती शिंदेंची अडचण वाढण्याची शक्यता आहे. 

हे ही वाचा : Anjali Damania : छगन भुजबळांच्या अडचणी वाढणार?

माढ्यातून रमेश बारस्कर यांना उमेदवारी दिली आहे. सातारामधून मारूती जानकर, धुळ्यातून अब्दुर रहमान, हातकणंगले मतदार संघातून दादासाहेब अका दादागौडा चौगडा पाटील, रावेरमधून   रावेर संजय ब्राम्हणे, जालन्यातून प्रभाकर बाकले यांनी उमेदवारी दिली आहे. आंबेडकर मुंबईतील उत्तर मध्यची जागा देखील लढवणार आहेत. या जागेवर त्यांनी अबुल हसन खान यांना उमेदवारी दिली आहे. तर   रत्नागिरी-सिंधुदुर्गमधून काका जोशी यांना उमेदवारी जाहीर केली आहे. 

वंचित बहुजन आघाडीची दुसरी यादी 

  • हिंगोली- डॉ. बी. डी चव्हाण
  • लातूर - नरसिंह राव उदगीरकर
  •  सोलापूर - राहुल गायकवाड
  •  माढा - रमेश बारस्कर 
  •  सातारा- मारूती जानकर 
  •  धुळे- अब्दुर रहमान 
  •  हातकणंगले- दादासाहेब अका दादागौडा चौगडा पाटील
  •  रावेर - संजय ब्राम्हणे 
  •  जालना- प्रभाकर बाकले 
  •  मुंबई नॉर्थ सेंट्रल - अबुल हसन खान 
  •  रत्नागिरी-सिंधुदुर्ग - काका जोशी ़

पहिली यादी 

  • अकोला- प्रकाश आंबेडकर
  • भंडारा-गोदिया- संजय केवट
  • गडचिरोली- हितेश मडावी
  •  चंद्रपुर- राजेश बेले 
  •  बुलढाणा- वसंत मगर 
  • अमरावती- प्राजक्ता पिल्लेवान
  • वर्धा- राजेंद्र साळुंके 
  • यवतमाळ-वाशिम- खेमसिंग पवार   

वंचितच्या पहिल्या लोकसभा उमेदवार यादीत 8 जणांचा समावेश होता. तर दुसऱ्या उमेदवार यादीत 11 जणांचा समावेश आहे. त्यामुळे वंचितने आतापर्यंत लोकसभेचे 19 उमेदवार जाहीर केले आहेत. 

    follow whatsapp